Friday, July 5, 2024

अभिनेत्री धनश्री वर्मा समोर पडली भारतीय क्रिकेटपटू चहलची विकेट, थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

यावर्षी कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले होते. म्हणूनच सर्वच वरवधू कोरोना संपण्याची किंवा अनलॉक होण्याची वाट बघत होते. जसे अनलॉक सुरु झाले तसा लग्नांचा एकदम बहरच आला. एकामागोमाग एका सेलिब्रिटी लग्नाचा लाडू खात आहे. यात आता अजून एका नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल व अभिनेत्री धनश्री वर्मा. आपल्या फिरकीने भल्याभल्या लोकांची विकेट काढणारा भारतीय क्रिकेट टीमचा हा गोलंदाज नुकताच विवाहबंधनात अडकला.

युजवेंद्र चहलने धनश्री वर्मा सोबत दिल्ली येथील गुरगावच्या कर्मा लेक रिसॉर्ट येथे हिंदू पद्धतीने लग्न केले. चहल आणि धनश्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या चहल आणि धनश्रीच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आले असून मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. लग्नाच्या फोटोमध्ये धनश्री गडद लाल रंगाच्या लेहेंगामध्ये, तर चहल गडद लाल पगडी आणि ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये ही दोघे खूप सुंदर दिसत होते. आयपीएलसाठी युएईला रवाना होण्यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये चहल आणि धनश्रीने साखरपुडा केला होता. त्यानंतर हे दोघे २०२० च्या आयपीएलसाठी एकत्र युएईमध्ये होते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमच्या आयपीएल सामन्यादरम्यान धनश्री चहलची टीम सपोर्ट करताना सुद्धा दिसली होती.

कोण आहे धनश्री वर्मा?

धनश्री वर्मा ही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. धनश्री एका मॉडेल, यूट्युबर, ट्रेंड डान्सर आणि कोरिओग्राफर असून ती तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच यूटुबवर अपलोड करत असते. तसे पहिले तर धनश्री एका डेंटिस्ट आहे. तिने मुंबईच्या डी.वाय.पाटील महाविद्यालयातून दंतविशारदची पदवी घेतली आहे. मात्र तिने करियर म्हणून डान्स, फिटनेस ट्रेनर आदी क्षेत्रांची निवड केली आहे. शिवाय धनश्रीची एका डान्स कंपनी देखील आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे लाखो फॉलोवर आहेत. तिच्या व्हिडिओला नेहमी लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात.

चहल आणि धनश्रीची लव्हस्टोरी 

या दोघांच्या लव्हस्टोरीत धनश्रीच्या डान्स व्हिडिओंचा खूप मोठा वाटा आहे. लॉकडाऊनमध्ये धनश्रीचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्याला धनश्रीचे व्हिडिओ आवडले. मग त्याने तिला डान्स आणि इतर काही गोष्टी शिकण्यासाठी संपर्क केला. त्यानंतर ह्या दोघांची भेट झाली आणि चहलची शिकवणी सुरु झाली. हळू हळू त्यांची मैत्री झाली आणि एका दिवस चहलने तिला मागणी घातली.

३० वर्षीय चहलने २०१६ मध्ये झिम्बाब्बे विरुद्ध खेळत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. अजिंता मेंडिस नंतर चहल हा दुसरा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने टी ट्वेंटीच्या एका सामन्यात इंग्लंड विरूद्ध सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. हा कारनामा त्याने २०१७ साली बंगलोरमध्ये केला. यावेळी त्याने ४ ओव्हर टाकत २५ रन देत ६ विकेट घेतल्या होत्या.

हे देखील वाचा