Saturday, June 29, 2024

चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस

भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्या होणाऱ्या बायकोचा युट्युबर धनश्री वर्मा हीचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये तिने नेहा कक्करच्या ‘शोना शोना’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीयोला तिच्या चाहत्यांनी लाईक करून अगणित प्रेम दिल आहे. असे अनेक डान्स व्हिडीओ धनश्री सतत सोशल मीडियावर अपलोड करत असते. यातले बरेचसे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल देखील झाले आहेत.

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलचं लग्न युट्युबर धनश्री वर्मा हिच्यासोबत ठरलं आहे. दोघेही सतत सोशल मीडियावर स्वतःच्या व्हिडीओ अपलोड करत असतात. क्सचहल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असला तरी मोकळ्यावेळेत सोशल मीडियावर वर शॉर्ट व्हिडीओज बनवणे हे त्याला आवडतं आणि हे आपण पाहत आलोच आहोत. परंतु चहलची पत्नी देखील त्याच्यापेक्षा कमी नाही हे सातत्याने दाखवून देत आलीये. तिने अनेकदा तिच्या डान्सच्या व्हिडीओज सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत आणि त्या तुफान व्हायरल देखील झाल्या आहेत.

असाच एक व्हिडिओ धनश्री ने नुकतीच सोशल मीडियावर अपलोड केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने नेहा कक्करच्या शोना शोना या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि शेअर देखील तितकाच केला आहे.

 

धनश्री वर्मा ही एक उत्तम डान्सर असून ती नेहमीच तिच्या व्हिडीओज मधून तिची कला सादर करत असते. धनश्रीचे इन्स्टाग्रामवर जवळपास २.५ मिलियन म्हणजेच २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या युट्युब चॅनलवर देखील काही लाखांमध्ये सबस्क्राईबर्स आहेत. चहल आणि धनश्री या दोघांचाही विवाहसोहळा कधी पार पडणार याकडे दोघांच्याही चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा