Monday, July 1, 2024

धनश्री वर्माने नोरा फतेहीच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स, चाहते म्हणाले ‘तू नोरापेक्षा उत्तम डान्स करते’

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) अनेकदा तिच्या डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत असते. वर्षाच्या शेवटच्या दिवशीही धनश्रीने एक जबरदस्त आणि धमाकेदार व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये ती गुरु रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या ‘डान्स मेरी रानी’ या प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सही उत्स्फूर्तपणे येत आहेत.

धनश्री वर्माने (Dhanashree Verma) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा जबरदस्त डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये टॉपसह हिरव्या रंगाची पँट परिधान केलेली धनश्री मोकळ्या केसांमध्ये अप्रतिम डान्स करत आहे. या डान्स व्हिडिओमध्ये तिच्या जबरदस्त डान्ससोबतच तिचे मोकळे, सरळ आणि लांब केसही हायलाइट केले जात आहेत.

व्हिडिओ पोस्ट करत धनश्री लिहिले की, “हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे, जसे की गाण्यातून हे माहीत होत आहे, मला आशा आहे की २०२२ मध्ये आपण सर्व आनंदाने डान्स करत असाल. फक्त आपल्या प्रियजनांसोबत रहा आणि प्रत्येक प्रकारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. लव्ह यू गाईज…” या व्हिडिओवर कमेंट करताना चाहते धनश्रीच्या डान्सचे कौतुक करत आहेत. काही युजर्सनी तिचा डान्स नोरापेक्षा चांगला असल्याचेही म्हटले आहे.

धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि डान्स व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच धनश्रीने डान्ससोबतच तिचे गायनाचे कौशल्यही चाहत्यांना दाखवले. अभिषेक बच्चन-करीना कपूर यांचे ‘मेरे हमसफर मेरे’ हे गाणे तिने संगीतबद्ध केले होते. क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर तसेच डेंटिस्ट आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा