Friday, July 5, 2024

कॉमेडियन नव्हे ‘या’ क्षेत्रात करिअर करणार होता झाकीर खान, वाचा रंजक किस्सा

लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेता झाकीर खानला न ओळखणारी व्यक्ती सापडणे तसे कठीणच. त्याच्या अनोख्या विनोदी अभिनयामुळे तो देशातच नाही तर परदेशात ओळखला जातो. तो दरवर्षी 20 ऑगस्टला आपला वाढदिवस साजरा करतो. त्याचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. परंतु झाकीरने त्याच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत व्यतीत केला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

झाकीरबद्दल (Zakir Khan) फार कमी लोकांना माहिती असेल की तो सतार वाजवतो. त्याने सतारचा डिप्लोमाही केला आहे. त्याने एकदा सांगितले होते की जर तो स्टँड-अप कॉमेडियन नसता तर तो संगीत शिक्षक झाला असता. 2012 मध्ये, कॉमेडी सेंट्रलने आयोजित केलेल्या ‘इंडियाज बेस्ट स्टँड अप’चा किताब जिंकून तो रातोरात प्रसिद्ध झाला. अनेक स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये परफॉर्म करण्यासोबतच त्याने भूतलेखनही केले आहे. याशिवाय त्याने रेडिओ शोची निर्मितीही केली आहे. 2017 मध्ये त्याच्या लोकप्रियतेमुळे, त्याला प्रसिद्ध कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये मार्गदर्शक म्हणून भाग घेण्याची संधी मिळाली.

झाकीर खानच्या लोकप्रियतेचा अंदाज त्याच्या सोशल मीडियावरील चाहत्यांवरुन लावता येतो. त्याचे व्हिडिओ अनेकदा यूट्यूबवर ट्रेंड करू लागतात. याशिवाय इंस्टाग्रामवरही त्याची चांगली फॅन फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर त्याला 46 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. त्याच्या प्रत्येक पोस्टवर लाखो लाईक्स येतात.

झाकीरची खरी ओळख स्टँड-अप कॉमेडीमध्ये आहे. त्याने देशात तसेच परदेशातही अनेक शो केले आहेत. इतर देशांतही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. जेव्हा तो दुसऱ्या देशात शो करतो तेव्हा त्या शोची तिकिटे लगेच विकली जातात. याशिवाय त्याने अभिनयातही हात आजमावला आहे. आत्तापर्यंत तो दोन वेब सिरीजमध्ये दिसला आहे. एमेझॉन प्राइमवरील त्यांची ‘चाचा विधायक हैं हमारे’ ही वेबसिरीज खूप गाजली होती. या शोमधील त्याचा अभिनय खूप आवडला होता. या सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.

हेही वाचा –
एकेकाळी रणदीप हुड्डा करायचा गाड्या साफ अन् रेस्टॉरंटमध्ये काम; आज आहे बॉलिवूडचा स्टार
72वर्षीय रजनीकांत यांनी धरले 51वर्षीय मुख्यमंत्र्यांचे पाय; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा