Monday, September 25, 2023

72वर्षीय रजनीकांत यांनी धरले 51वर्षीय मुख्यमंत्र्यांचे पाय; पाहा व्हिडिओ

गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) देशभरात ‘जेलर‘ चित्रपट रिलीज झाल आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच राडा केला आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ‘जेलर’ एक आठवड्यानंतरही बक्कळ कमाई करत इतर सिनेमांचे विक्रम मोडताना दिसला. या दरम्यान साऊथ सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या यशानंतर सध्या यूपीच्या दौऱ्यावर आहेत. अभिनेत्याने यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी भेट घेतली.

याआधी रजनीकांत (Rajinikanth) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. अखिलेश यांची भेट घेतल्यानंतर रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी सीएम योगी यांच्यासोबतची भेट खूप चांगली असल्याचे सांगितले. शनिवारी (19 ऑगस्ट) त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी गेले होते, जिथे योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.तसेच त्यांना जेलर चित्रपट दाखवला. इतकच नाही तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे अर्शिवाद देखील घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियार जोरदार व्हायरल होत आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, ‘जेव्हा मनं भेटतात तेव्हा लोक मिठी मारतात. म्हैसूरमध्ये अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान रजनीकांत यांना पडद्यावर पाहून जो आनंद वाटायचा तो आजही कायम आहे. आम्ही 9 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भेटलो आणि तेव्हापासून आम्ही मित्र आहोत…’

 जेलर चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. यात रजनीकांत मुख्य भूमिकेत असून विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी, सुनील, योगी बाबू आदी कलाकार आहेत. (Rajinikanth met Chief Minister Yogi Adityanath, the video went viral)

अधिक वाचा- 
एकेकाळी रणदीप हुड्डा करायचा गाड्या साफ अन् रेस्टॉरंटमध्ये काम; आज आहे बॉलिवूडचा स्टार
‘दुनिया गेली तेल लावत…’ बहूप्रतीक्षित ‘तीन अडकून सीताराम’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा