झरीन खान (Zareen Khan) नं तिच्या इंस्टावर एक व्हिडिओ टाकला आणि लग्नाबद्दल आपली मतं सांगितली. ती म्हणाली, “आजकालची लग्नं फारतर २-३ महिनेच टिकतात!” झरीन खाननं सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं होतं. त्यानंतर तिनं काही चित्रपट केले, पण तिचं करिअर फारसं यशस्वी ठरलं नाही. कामामध्ये फार काही विशेष घडलं नाही आणि तिचं वैयक्तिक आयुष्यही सोपं नव्हतं. तिनं ब्रेकअपचं दुःखही पाहिलं. या सगळ्या दरम्यान, ३८ वर्षांची झरीननं तिच्या इंस्टावर एक व्हिडिओ टाकला आहे, ज्यामध्ये ती लग्नाबद्दल बोलताना दिसते.
इंस्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये झरीन खान म्हणते, “मी इंस्टावर काही कमेंट्स वाचल्या, माझ्या व्हिडिओ आणि पोस्टवर त्यात एक कमेंट होती जी खूप लक्षात आली ‘लग्न कर, आता म्हातारी होत्येस!’ यावर झरीन हसून म्हणाली,’अरे, लग्न केलं की मी परत तरुण होणार का?'” झरीन खान पुढे म्हणाली,”मला समजत नाही ही गोष्ट फक्त आपल्या देशात आहे की सगळीकडेच असं असतं. आपल्याकडे तर कुठलीही अडचण असली की लोक लगेच म्हणतात लग्न कर!
एखादा माणूस जर आयुष्यात लक्ष नाही देत, कामधंदा करत नाही, तर घरचे लगेच म्हणतात त्याचं लग्न लावून टाका. पण हे काय उत्तर आहे? जो स्वतःचं नीट बघू शकत नाही, जबाबदारी घेऊ शकत नाही, त्याच्यावर तुम्ही आणखी एक माणूस टाकता. अशी वेळ आली तर दोघांची आयुष्यं बिघडतील ना! म्हणून मला वाटतं, लग्न म्हणजे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन नाही.”
झरीन पुढे म्हणते,”आणि जर मुलगा किंवा मुलगी थोडी घरच्यांच्या म्हणण्याबाहेर वागत असेल, तर आपल्या समाजात आई-वडिलांना लगेच भीती वाटते ‘बापरे, मुलगी हातातून गेली’ आणि लगेच सल्ला येतो लग्न लावून टाका! पण लग्न काही जादू नाहीये ना, की एकदा लग्न झालं की सगळं आपोआप ठीक होईल. कारण मी बघतेय आजकालची लग्नं दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त टिकतच नाहीत. म्हणून मला नाही वाटत की लग्न म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम्सचं उत्तर आहे”.
झरीन खान आता 38 वर्षांची आहे आणि सध्या ती एकटीचं आयुष्य एंजॉय करतेय. ती काही वर्षं ‘बिग बॉस’मध्ये आलेल्या शिवाशीष मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण 2024 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. तेव्हापासून झरीन सिंगल आहे आणि स्वतःचं आयुष्य मस्त जगतेय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणवीर सिंग-श्री लीला आणि बॉबी देओल दिसणार मेगा चित्रपटात, लवकरच पहिला लूक येणार समोर