Saturday, July 27, 2024

Bobby Deol:…म्हणून मी खलनायकाची भूमिका स्विकारली,‘अ‍ॅनिमल’मधील पात्रावर बॉबी देओल स्पष्टच बोलला

एकेकाळी चॉकलेट हिरो म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) अ‍ॅनिमल’ चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे. या चित्रपटात बॉबी देओल अबरार नावाच्या नकारात्मक भूमिकेत दिसला होता. यात त्याचा एकही संवाद नव्हता कारण हे पात्र मूक होतं. पण बॉबी देओलने केवळ१५ मिनिटांच्या भूमिकेत आपला दबदबा निर्माण केला. मात्र, त्याच्या या भूमिकेवर काही चाहत्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली. दरम्यान, एका मुलाखतीत बॉबी देओलने साकारलेल्या या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले.

काही दिवसांपूर्वी बॉबीला या चित्रपटासाठी उत्कृष्ट खलनायकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याच्यावर कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव झाला. अशातच, सोमवारी मुंबईत झी सिने 2024 अवॉर्ड्सची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ॲनिमल स्टार बॉबी देओल, बॉलिवूडची हॉट सेन्सेशन मौनी रॉय आणि अभिनेता अपारशक्ती खुराना दिसले. यावेळी या स्टार्सनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

‘झी सिने अवॉर्ड २०२४’च्या पत्रकार परिषदेदरम्यान बॉबीनेदेखील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या या पात्राबद्दल भाष्य केलं.

काय म्हणाला बॉबी देओल?

मला अशाच आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत, ज्या साकारताना माझ्यातील अभिनय कौशल्याचा कस लागेल. सकारात्मक भूमिका आणि नकारात्मक भूमिका असं काहीच नसतं. पूर्वी कॉमेडीयन, व्हिलन आणि हीरो असं विभाजन केलं जायचं, पण आता तसं राहिलेलं नाही. काळानुसार चित्रपट, कथा सादर करायची पद्धत बदलली आहे.

माझ्यासाठी ही नकारात्मक भूमिका पेलणं हे एक मोठं आव्हानच होतं. आपल्या सगळ्यांमध्ये अशा काही वाईट गोष्टी आहेत अन् जेव्हा आपण त्यावर मात करतो तेव्हाच आपण एक चांगला माणूस म्हणून घडतो. यासाठी अशा नकारात्मक पात्रांची फार मदत होते. चित्रपटातील माझं पात्र अब्रार असा का झाला यामागेही काही ठोस कारणं आहेत.

मी जेव्हा ते पात्र साकारलं तेव्हा मी ते नकारात्मक आहे किंवा खलनायक आहे असा विचार केला नाही, ते पात्र त्याच्या कुटुंबाचा हीरो आहे अशाच दृष्टीने मी त्याकडे पाहिलं. असं बॉबी त्याच्या खलनायकाच्या भूमिकेवर स्पष्टच बोलला.

हेही वाचा:

Akshay Kumar Tiger Shroff : असं काय घडलं ? चाहत्यांनी थेट अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफवर फेकल्या चपला

हे देखील वाचा