Sunday, May 19, 2024

जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना ‘या’ कारणासाठी करावा लागला रिक्षेने प्रवास

बॉलिवूडमधील ७० आणि ८० च्या दशकातील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून झीनत अमान या ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या मादक अवताराने आणि प्रभावी अभिनयाने सर्वच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आज जरी झीनत बॉलिवूडमध्ये तितक्याशा सक्रिय नसल्या तरी त्या टेलिव्हिजनवरील विविध शो मध्ये, विविध अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसत असतात. आता तर त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय झाल्या आहेत. त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमान यांनी नुकताच त्यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्या रिक्षेने प्रवास करताना दिसत आहे. झीनत यांनी रिक्षाने प्रवास करताना शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ७१ वर्षीय झीनत अमान अतिशय एलिगंट लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्यांचे आणि नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक जेनसुकी यांनी त्यांना चहा साठी आमंत्रण दिले होते, तिथे त्या रिक्षाने पोहचल्या. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “मागच्या महिन्यात जेनसुकी यांनी मला कॉफीसाठी आमंत्रित केले. ते मला म्हणाले होते की ते मला घ्यायला येतील. मी कधीच विचार केला नव्हता की माझी राईड अशी असेल. ओह ठीक आहे. जीवन असेच अप्रत्यक्षित आहे. जर आपल्याला मोठे व्हायचे असेल तर आपल्याला अनुकूल राहायला पाहिजे. सर्वांचा आठवडा चांगला जावो.”

सध्या झीनत यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाले तर त्यानी आधीच स्पष्ट केले की, सध्या त्यांचा कमबॅकचा असा कोणताही विचार नाही. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीपासून कामाला सुरुवात केली त्यानंतर अनेक वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत राहिल्या.

हेही वाचा-
अरे बापरे! चक्क झीनत अमानवर उचलला होता ‘या’अभिनेत्याने हात, वाचा संपूर्ण किस्सा…
तबस्सुम थाटात जगत होत्या आयुष्य, एवढ्या कोटींची संपत्ती ठेवली राखूण

हे देखील वाचा