Friday, May 24, 2024

अरे बापरे! चक्क झीनत अमानवर उचलला होता ‘या’अभिनेत्याने हात, वाचा संपूर्ण किस्सा…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. झीनत अमान आजही चित्रपटांमधील तिच्या ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते. त्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्मामुळे देखील चर्चेत असतात. अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत झीनत अमान यांनी काम केले आहे. 1970 मध्ये फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया पॅसिफिक इंटरनेशनल या स्पर्धेमध्ये झीनत अमान यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

1971मध्ये प्रदर्शित झालेल्या हलचल या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटामुळे झीनत अमान यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात देव आनंद यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. झीनत आमान यांना वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. माध्यमाच्या वृत्तानुसार, झीनत अमान यांनी अभिनेता संजय खानसोबत लग्न केले होते. पण संजय खान हे सार्वजनिक ठिकाणी झीनत अमान यांच्याबद्दल बोलणे टाळत होते.

वृत्तानुसार, एका पार्टीमध्ये संजय आणि झीनत अमान यांच्यामध्ये भांडण झालं. त्यानंतर संजय खान यांनी  झीनत अमान यांना मारलं. त्यानंतर झीनत अमान यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर झीनत अमान आणि संजय खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

संजय खान यांच्यासोबत विभक्त झाल्यानंतर मजहर खान या चित्रपट निर्मात्यासोबत झीनत अमान यांनी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना दोन मुलं आहेत. पण मजहर खान आणि झीनत अमान हे देखील विभक्त झाले. त्याचवेळी मजहरचाही दीर्घ आजाराशी लढा देत मृत्यू झाला. झीनत अमान यांनी धरमवीर, यादों की बारात, सत्यम शिवम सुन्दरम आणि डॉन या हिट चित्रपटांमध्ये काम केले. (Actress Zeenat Aman was beaten under the ear by Sanjay Khan)

आधिक वाचा-
करीना कपूरसोबत केली होती अभिनयाची सुरुवात, तर ‘असा’ होता तुषार कपूरच्या कारकिर्दीचा आलेख
सौंदर्यामुळेच जुंपले विश्वसुंदरींमध्ये भांडण, अभिनेत्री ऐश्वर्या राय-सुष्मिता सेनमधील गाजलेला किस्सा

हे देखील वाचा