बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना डांन्सचे दादा देखिल म्हणून ओळखले जाते. त्यांचा नवीन बंगाली चित्रपट ‘प्रजापती‘ला क्रिसमस आठवड्यामध्ये चित्रपट परिसरात जागा नाही मिळाली म्हणून नवीन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामध्ये मिथुंदा आणि कॉंग्रेस पक्षाचे सांसद देव हे मुख्य भूमिकेत आहेत.
प्रसिध्द अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या काळात बॉलिवूडमधील अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. त्यांनी केलेल्या अनेक भूमिकांचे आजही कौतुक केल जाते. त्याशिवाय चाहते त्यांचे गाजलेले चित्रपट आजही आवर्जून पाहात असतात. मात्र, सध्या अभिनेता चित्रपटांशिवया राजकारणातही सक्रिय झाले आहेत. नुकतंच नाताळ सन पार पडला असून या आठवड्यामध्ये मिथुन यांच्या बंगाली चित्रपट ‘प्रजापती’ला नंंदन चित्रपटगृहात जागा मिळाली नाही म्हणून वाद निर्माण झाला आहे.
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या संपादकाने सांगितले की, “नंदनच्या बाबतीत माझ्या पुढच्या चित्रपटाला हे स्थान मिळेल अशी आशा आहे, आमच्याकडे या विषयावर भाष्य करण्यासारखे काहीही नाही.” नंदनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा चॅटर्जी यांनी पीटीआयला सांगितले की, “आमचे एक न्याय धोरण आहे, आम्ही चांगल्या बंगाली सिनेमाला प्रोत्साहन देतो आणि त्या वेळी हॉलच्या उपलब्धतेवर आधारित अशा चित्रपटांना सामावून घेण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो.”
सागायचे झाले तर, विधानसभा निवडणुकीपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. त्यानंतर बंगाल भाजपच्या कोअर कमिटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नुकतेच ते बंगालच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक देखिल घेतली होती.
बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप मिथुन चक्रवर्ती यांचा पंचायत निवडणुकीत वापर करण्याचा विचार करत आहेत असेही दिसून येत आहे. मिथुन चक्रवर्ती आता केवळ भाजपचाच प्रचार करत नाहीत, तर भाजपच्या संघटनात्मक कामातही ते भाग घेत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अलीकडेच त्यांनी राज्यातील भ्रष्टाचाराबाबत ममता बॅनर्जी सरकारवरही जोरदार हल्ला केला आणि तृणमूल काँग्रेसचे तीन डझनहून अधिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचाही त्यांनी दावा केला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष! अभिनेत्री गिरिजा ओकचे ग्लॅमरस फाेटाे पाहिले का?
लेकीचा मृत्यूनंतर तुनिषाच्या आईने व्यक्त केला संताप म्हणाली,’त्याने 3-4 महिने माझ्या मुलीला…’