Sunday, April 14, 2024

लेकीचा मृत्यूनंतर तुनिषाच्या आईने व्यक्त केला संताप म्हणाली,’त्याने 3-4 महिने माझ्या मुलीला…’

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने अवघ्या 20 वयातच  (दि, 24 डिसेंबर) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनांनंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. त्याशिवाय तिचा को-स्टार शीजान खान यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र, यासगळ्या गोष्टीमध्ये तुनिषाच्या आई-वडीलांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ शेअर केला आहे. 

‘अली बाबा दास्तान ए: काबुल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunusha Sharma) हिने आत्माहत्या केली मात्र, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. नुकंतच सोशल मीडियावर तुनिषची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी लेकीच्या आत्महत्येचं कारण शीजन खानला ( Sheezan Mohammed Khan) ठरवलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुनिषाच्या आईने सांगितले की,”शीजान मोहम्मद खान याने माझ्या मुलीला धोका दिला आहे. आधि त्याने माझ्या मुलीसोबत नातं निर्माण केलं आणि लग्न करण्याचंही वचन दिलं होतं. यानंतर त्याने तुनिषासोबत ब्रेकअप केलं. एवढेच नाही तर त्याचं आधीच दुसऱ्या मुलीसोबतही अफेअर चालु होतं मात्र, तरीही त्याने माझ्या मुलिसोबत नातं बनवलं. तिला 3-4 महिने त्याने वापरले आणि धोका दिला. माझं फक्त एवढेच म्हणने आहे की, शीजानला कडक शिक्षा झाली पाहिजे.  माझं मुल गेलं आहे त्याला कोणत्यही परिस्थितीत सोडलं नाही पाहिजे.”

तुनिषा शर्माच्या आईने व्हिडिओ माध्यमाद्वारे शीजानवर गंभीर आरोप केले आहेत. वनिता शर्मा यांच्या वक्तव्यापासूनच शीजान खानला मुंबई पोलिसांनी 4 दिवसांची कस्टडी मागितली आहे ज्यामुळे शीनाजची सतत चौकशी होत आहे. “आमचा धर्म वेगळा आहे, त्याशिवाय आमच्यामध्ये वयाचा मोठा अंतर आहे त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं,” असं शीजानने चौकशीदरम्यान सांगिते होतं.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेशम टिपणीसवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘ही’ जवळची व्यक्ती गमवल्याने हळहळली अभिनेत्री
कोण होते खऱ्या आयुष्यातील ‘तारक मेहता’? वाचा ‘तो’ रंजक किस्सा

हे देखील वाचा