Wednesday, February 4, 2026
Home हॉलीवूड ‘पावरकपल’ झायन मलिक अन् गीगी हदीद झाले वेगळे, गायकावर सासूने लावले गंभीर आरोप

‘पावरकपल’ झायन मलिक अन् गीगी हदीद झाले वेगळे, गायकावर सासूने लावले गंभीर आरोप

सुपरमॉडेल गीगी हदीद आणि गायक झायन मलिक हे प्रसिद्ध जोडपे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्यांचे फोटो असो किंवा व्हिडिओ, त्यांना चाहते भरभरून प्रेम देतात. त्यांना एकत्र पाहण्यासाठी देखील चाहते बरेच उत्सुक असतात. मात्र आता हे सुप्रसिद्ध जोडपे वेगळे झाले आहे. होय, दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर गीगी आणि झायनचे ब्रेकअप झाले आहे.

गीगी हदीदची आई योलांडा हदीदने झायनवर तिला मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतरच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. त्यांच्या कुटुंबातील एका जवळच्या मित्राने सांगितले की गीगी आणि झायन आता एकत्र नाहीत. हे दोघेही त्यांच्या मुलीचे चांगले पालक आहेत आणि तिची एकत्र काळजी घेतात. दुसरीकडे, योलांडा तिची मुलगी गीगी आणि नातीसाठी खूप काळजीत आहे. (zyan malik and gigi hadid broke up after two years of dating)

गीगी हदीद आणि झायन मलिक झाले वेगळे
ब्रेकअपची बातमी समोर आल्यानंतर एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यात म्हटले गेले आहे की, गीगी आता फक्त तिची मुलगी खाईचा विचार करत आहे. तिला सध्या गोपनीयता हवी आहे. त्याच वेळी, या प्रकरणी योलांडा किंवा झायन मलिककडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

गीगीची आई योलांडाने माराहाणीचे आरोप केल्यानंतर, गुरुवारी (२८ ऑक्टोबर) झायन मलिकने एक निवेदन जारी केले. या दाव्यांवर बोलताना मलिकने प्रतिक्रिया दिली आणि आरोप खोटे असल्याचे सांगितले.

आपल्या निवेदनात झायन म्हणाला, “तुम्हा सर्वांना माहिती आहे की, मी एक खाजगी व्यक्ती आहे आणि मला माझ्या मुलीसाठी एक अतिशय सुरक्षित वातावरण तयार करायचे आहे जिथे ती मोठी होईल. अशी जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात, मी निर्णय घेतला आहे की माझ्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यासोबत झालेल्या वादामुळे मी दाव्याला विरोध न करण्याचे ठरवले आहे.” आरोपांनंतर झायनने ट्विटरची मदत घेत आपले म्हणणे मांडले. हे प्रकरण खाजगी असायला हवे होते, पण ज्या प्रकारे ते प्रेसमध्ये लीक झाले, त्यामुळे त्याला खूप खेद वाटतो, असेही तो म्हणाला.

हॉलिवूडचे हे ‘पावरकपल’ वेगळे झाल्यामुळे चाहते खूप निराश झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

हे देखील वाचा