Saturday, July 19, 2025
Home बॉलीवूड कोर्टाचा मोठा निर्णय! शमीने दर महिन्याला द्यायचे 4 लाख

कोर्टाचा मोठा निर्णय! शमीने दर महिन्याला द्यायचे 4 लाख

मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami)एक्स वाइफ हसीन जहां (Hasin Jahan) म्हणाली की, शमीने मला जबरदस्तीने फक्त घरातच बसवून ठेवलं, घरकाम करणारी बायकोच बनवून टाकलं.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीला कोर्टाने आदेश दिला आहे की, त्याने आपल्या एक्स बायको हसीन जहां हिला दर महिन्याला चार लाख रुपये द्यावे. हसीन जहांने शमीवर आरोप करत म्हटलंय की, ती आधी मॉडेल होती, पण लग्न झाल्यावर शमीने तिला जबरदस्तीने घरात बसवलं आणि हाउसवाइफच बनवून टाकलं.

न्यूज एजन्सी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हसीन जहां म्हणाली, “लग्नाआधी मी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग करायचे, पण शमीने मला ते सगळं सोडायला लावलं. त्याला हवं होतं की, मी फक्त घरात राहावं, गृहिणीच बनावं. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, म्हणून सगळं मान्य केलं. पण आता माझ्याकडे स्वतःची काही कमाईच उरलेली नाही.”

हसीन जहां पुढे म्हणाली, “आमचं आयुष्य चालवायची जबाबदारी शमीचीच होती. पण जेव्हा त्याने ती जबाबदारी घेतली नाही, तेव्हा आम्हांला कोर्टात जावं लागलं. बरं झालं आपल्या देशात कायदा आहे, जो अशा लोकांना जबाबदारीचं भान देतो. कोणाचं खरं रूप पहिल्यांदाच ओळखता येत नाही. कोणी वाईट आहे, फसवणूक करणार आहे, की गुन्हेगार आहे, हे चेहऱ्यावरून समजत नाही. माझ्यासोबतही असंच झालं. मी ही अशाच फसवणुकीचा बळी ठरले.”

मॉडेल राहिलेल्या हसीन जहां म्हणाली, “अल्लाहने मोठमोठ्या गुन्हेगारांना माफ केलंय, पण शमीला आपल्या मुलीचं सुख, सुरक्षितता आणि भविष्य काहीच दिसत नाही. आता तरी त्याने मला त्रास देणं बंद करावं. तो मला संपवू शकत नाही, कारण मी न्यायाच्या बाजूने आहे आणि तो चुकीच्या वाटेवर चाललाय.” हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण चार वर्षांनी हसीनने शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

रामायणात दिसणार मराठी हिंदी आणि दक्षिणात्य कलाकार; सिनेमाचे बजेट ऐकून तुम्हाला चक्कर येईल…

हे देखील वाचा