Saturday, July 19, 2025
Home बॉलीवूड रामायणात दिसणार मराठी हिंदी आणि दक्षिणात्य कलाकार; सिनेमाचे बजेट ऐकून तुम्हाला चक्कर येईल…

रामायणात दिसणार मराठी हिंदी आणि दक्षिणात्य कलाकार; सिनेमाचे बजेट ऐकून तुम्हाला चक्कर येईल…

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाबद्दल दररोज नवीन अपडेट्स येत आहेत. या चित्रपटाचे बजेट ८३५ कोटी रुपये आहे. या चित्रपटात जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स टीम आणि भव्य सेट पाहायला मिळणार आहे.

नितेश तिवारी यांच्या रामायणात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्याची पहिली झलकही समोर आली आहे.

दक्षिणातील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी साई पल्लवी रामायणात माँ सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे.या चित्रपटात लोकप्रिय टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रामायणात तुम्हाला अरुण गोविल राजा दशर्षच्या भूमिकेत दिसतील. वृत्तानुसार, अमिताभ बच्चन रामायणात जटायूच्या भूमिकेत दिसतील. नितेश तिवारीच्या रामायणात लारा दत्ता केकेकीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

काजल अग्रवाल रावणाची पत्नी मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ स्टार यश या चित्रपटात लंकापती रावणाची भूमिका साकारत आहे.या चित्रपटात तुम्हाला आदिनाथ कोठारे रामाचा भाऊ भरतच्या भूमिकेत दिसेल. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसेल.रामायण चित्रपटात कुणाल कपूर इंद्र देवच्या भूमिकेत दिसणार आहे. रामाची आई कौशल्या यांच्या भूमिकेत इंदिरा कृष्णन दिसणार आहेत.

या चित्रपटात शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत दिसणार आहेत रावणाची बहीण शूर्पणखा यांच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंह दिसणार आहे.रामायणात विवेक ओबेरॉय शूर्पणखेच्या पती विद्युतजीवाच्या भूमिकेत दिसणार आहे

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

हुमा कुरेशीने केला आयटम साँगबद्दल खुलासा; म्हणाली, ‘चुकीच्या ठिकाणी आलात…’

हे देखील वाचा