Saturday, July 19, 2025
Home बॉलीवूड परेश रावल परतले, सुनील शेट्टीचा मजेशीर रिअ‍ॅक्शन!

परेश रावल परतले, सुनील शेट्टीचा मजेशीर रिअ‍ॅक्शन!

‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) मध्ये परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा परतला आहे. यावर श्यामची भूमिका करणारा सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty)आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी ही धमाल तिकडी पुन्हा एकदा ‘हेरा फेरी 3’ मध्ये एकत्र दिसणार आहे. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या मजेदार कॉमेडीच्या तिसऱ्या भागात आधी बरंच काही गोंधळ झालं होतं. काही वेळा आधी परेश रावल यांनी हा चित्रपट साेडला होता आणि त्यामुळे अक्षय कुमारच्या कंपनीने त्याच्यावर २५ कोटींचा दावा केला होता. पण आता सगळं ठीक झालं आहे, आणि परेश रावल परत आले आहेत. या गोष्टीवर सुनील शेट्टीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असताना, ‘साई सफर’ या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी 3’ मध्ये परेश रावल परतल्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी पण ऐकतोय की सगळं सेट झालंय. पण आता चित्रपट प्रदिर्शत झाल्यावरच काही बोलणार, त्याआधी हेरा फेरीबद्दल काहीही नाही बोलणार.” सुनील शेट्टीने चित्रपटाच्या खास गोष्टींबद्दल बोलताना सांगितलं की ‘हेरा फेरी 3’ मूळ भागासारखीच असेल. अशी चित्रपट जी सगळेजण एकत्र बसून पाहू शकतील आणि मनसोक्त हसू शकतील.

तो म्हणाला, “ही सुद्धा पहिल्या दोन भागांसारखीच एक मजेशीर फॅमिली फिल्म असेल. जी फक्त हसवणार आहे आणि तुम्ही ती सगळ्या घरच्यांसोबत आरामात पाहू शकता.” सुनील शेट्टी हेही म्हणाला, “ही एकदम फॅमिली फिल्म आहे. अशी फिल्म जिथे सगळे मिळून एकत्र बसून पाहू शकतात. एकदा का टीव्ही चालू केला की, मग काही टेन्शन नाही, लाज वाटण्यासारखं काहीच नाही. कारण लोक फक्त हसणारच आहेत. ही फिल्म लपूनछपून बघायची गरज नाही, सगळ्या कुटुंबासोबत आरामात बघता येते.”

या सगळ्याच्या दरम्यान, परेश रावल यांनी अलीकडेच सांगितलं की, ते ‘हेरा फेरी 3’ मध्ये परतले आहेत. हिमांशु मेहता यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन यांचं कौतुक केलं. जेव्हा त्यांना चित्रपटामधल्या वादाबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले, “कसलाही वाद नव्हता.” त्यांनी पुढे सांगितलं, “लोक जर एखाद्या गोष्टीवर इतकं प्रेम करत असतील, तर आपलं काम असतं अजून मेहनत करणं. सगळे मिळून मेहनत करायची. बस, एवढंच. आता सगळं ठीक आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

कपिल शो मध्ये लागणार चौकार षटकार; भारतीय क्रिकेट संघाचे हे दिग्गज लावणार मंचावर हजेरी…

हे देखील वाचा