अनन्या पांडे ही एक लोकप्रिय कलाकार आहे. तसेच तिने आता पर्यत अनेक चित्रपट केले आहेत. आणि त्यातील काम मुळे अनेक प्रेक्षकाच्या मनात तिने घर निर्माण केले आहे. पण आता तिच्या एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट म्हणजे ‘चांद मेरा दिल’, आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनन्या पांडेसोबत लक्ष्य लालवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण अनन्याच्या एका नृत्य दृश्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
‘चांद मेरा दिल’ हा चित्रपट 22 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘चांद मेरा दिल’मधील एक क्लिप सोशल मीडियावर व व्हायरल होत असून, त्यामुळे मीम्सचा पूर आला आहे. ही व्हिडिओ क्लिप एका नृत्य दृश्यातील आहे, ज्यात लक्ष्य लालवाणीचे पात्र अनन्या पांडेच्या ‘चांदनी’ या पात्राच्या प्रेमात पडते. मात्र, अभिनेत्रीच्या शास्त्रीय नृत्यामुळे प्रेक्षक निराश झाले आहेत.
‘चांद मेरा दिल’मध्ये अनन्या पांडेने (panday)यात शास्त्रीय नृत्य केले असुन तीने एक शास्त्रीय नृत्य शिकणारी मुलगी असते असे या चित्रपटातील तिचा रोल आहे मात्र तिच्या या नृत्यामुळे प्रेक्षक खुश नाहीत. त्यामुळे अनन्याच्या नृत्यावर सोशल मीडिया वापरकर्ते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या प्रतिक्रिया म्हणजे इ.स. 200 मध्ये भरतनाट्यमचा ऱ्हास सुरू झाला. 2026 मध्ये अनन्या पांडेसोबत त्याचा अंत झाला.” तर एका लिहले आहे की भरतनाट्यम नष्ट झाल अस वाटत आहे. अश्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.










