बॉलिवूडची दिवा प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) आई होण्याची घोषणा केल्यापासून चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. या आनंदात अनेक प्रश्नही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. प्रियांकाला मुलगी झाली की मुलगा? मुलाचा जन्म कधी झाला? प्रियांकाने सरोगसीचा वापर का केला? वगैरे वगैरे… मात्र एका रिपोर्टनुसार, प्रियांका एका मुलीची आई झाली आहे.
१२ आठवड्यांपूर्वी आई बनली प्रियांका
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या १२ आठवड्यांपूर्वी प्रियांकाच्या मुलीचा जन्म झाला आहे. या जोडप्याच्या मुलीचा जन्म लास वेगासच्या बाहेरील दक्षिण कॅलिफोर्नियातील रुग्णालयात झाला. प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळ काहीसे अशक्त आहे. यामुळे, निक-प्रियांका यांनी ठरवले आहे की, जोपर्यंत मूल पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत ते रुग्णालयातच राहील. बाळाची डिलिव्हरीची तारीख एप्रिलमध्ये असल्याचे बोलले जात होते. यामुळे प्रियांकाने तिच्या कामाच्या सर्व कमिटमेंट्सही पूर्ण केल्या होत्या. जेणेकरून बाळाच्या जन्मानंतर तिला मातृत्वाचा आनंद घेता येईल. बाळाच्या जन्माच्या एक आठवड्यानंतर प्रियांकाने गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (priyanka chopra premature baby admitted in hospital born 12 weeks early)
प्रियांकाने शेअर केली पोस्ट
प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आम्ही सरोगसीद्वारे आमच्या आयुष्यात मुलाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक आमच्या गोपनीयतेची काळजी घेण्याची विनंती करतो, जेणेकरून या विशेष काळात आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करता यावे.”
बेबी प्लॅनिंगबद्दल केला होता खुलासा
प्रियांका चोप्राने ‘द जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ शोमध्ये निकसोबत बेबी प्लॅनिंगबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. निकच्या भावांचे उदाहरण देताना शोमध्ये ती गंमतीत म्हणाली की, “आम्ही असे एकमेव जोडपे आहोत ज्यांना अद्याप मुले झालेली नाहीत. म्हणूनच आज मी सर्वांना सांगू इच्छिते की, निक आणि मी बेबी प्लॅनिंग करत आहोत.”
तसेच प्रियांका आणि निकने २ डिसेंबर २०१८ रोजी, उदयपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजांनी लग्न केले होते.
हेही वाचा :
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान