Sunday, July 14, 2024

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

नोरा फतेही हे नाव सध्या सोशल मीडिया आणि सिनेसृष्टीत सगळीकडे नेहमी चर्चेत असत. नोरा आपले बोल्ड फोटो आणि डान्सचे व्हिडिओ नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडिओला चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. आता पुन्हा एकदा नोराचा असाच एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नोरा फतेहीने (nora fatehi) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या थक्क करणाऱ्या नृत्यकौशल्याने तिने इतकी प्रसिद्धी मिळवली आहे की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. आजच्या घडीला नोरासोबत एकदा तरी डान्स करावा अशीच प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. नोराच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच प्रसिद्ध होत असतात. तिचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ज्यामध्ये नोरा आणि कोरिओग्राफर टेरेन्स लुईसच्या रोमँटिक डान्सने सगळ्यांच लक्ष वेधले आहे. (tarence lewis nora fatehi sizzling chemistry while dancing on bheegi bheegi ratoon mein)

हा व्हायरल व्हिडिओ ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावरील आहे, ज्यामध्ये नोराला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नोराने आपल्या डान्सने सगळ्यांना थक्क केल्याच दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला गीता कपूर टेरेन्सला रेट्रो गाणी पसंद असून त्यावर तो डान्स करणार आहे असे सांगत त्याच्यासोबतीला नोरा साथ देणार असल्याच म्हणताना दिसत आहेत.

नोरा आणि टेरेन्सच्या या भन्नाट डान्सला गीता कपूर कोरिओग्राफ करत आहेत. ‘भीगी भीगी रातों में’ या रोमँटिक गाण्यावर हा सुंदर डान्स त्यांनी केला आहे. दोघांचे मूव्हज आणि स्टेप बघून सगळेच भान हरपून डान्स करताना दिसत आहेत. यावेळी फ्युजन साडीमध्ये थिकरणारी नोरा एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. तिची प्रत्येक स्टेप पाहणाऱ्याला मोहित करत आहे. यावेळी नोराच्या सौंदर्याने घायाळ झालेला टेरेन्ससुद्धा तिच्यासोबत भान हरपुन नोराला कधी मिठीत घेत तर कधी उचलून घेत डान्स करताना दिसत आहे. पाहणारे प्रेक्षक त्यांचा व्हिडिओ पाहून फिदा झाले आहेत.

हेही वाचा : 

 

हे देखील वाचा