Friday, July 5, 2024

बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन आहेत अनेक चुकीची मते, फॅमिली मॅन फेम प्रियामणीची खंत

बॉलिवूडमध्ये देशाच्या अगदी परदेशाच्या कलाकारांना देखील आपण अनेकदा काम करताना बघतो. बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील बरेच कलाकारसुद्धा आपण बघतो. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे ‘प्रियामणी’. मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ या सिरीजमध्ये प्रियामणी दिसली होती, या सिरीजच्या प्रदर्शनानंतर प्रियामणीला खूपच लोकप्रियता मिळाली. मात्र एका मुलाखतीमध्ये प्रियामणीने सांगितले की, बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना कशा पद्धतीने दाखवले जाते. दाक्षिणात्य कलाकारांची हिंदी भाषा एक्सेंटसोबत दाखवली जाते. मात्र याआधी अनेक साऊथ कलाकरांनी बॉलिवूडवर राज्य केले आहे.

प्रियामणीने तिच्या मुलाखतीमध्ये पुढे म्हटले की, “आता लोकांमध्ये दाक्षिणात्य कलाकार चांगलेच लोकप्रिय होताना दिसत आहे. इथली प्रतिभा सर्वांनाच आवडत आहे. एक काळ असा होता जेव्हा श्रीदेवी, रेखा, हेमा मालिनी आणि वैजंतीमाला आदी अनेक अभिनेत्री बॉलिवूडवर राज्य करत होत्या. पण त्यानंतर कोणताच साऊथचा कलाकार एवढा यशस्वी झाला नाही. बॉलिवूडमध्ये बहुतकरून हिंदी भाषिक कलाकार आणि लोकं जास्त दिसतात. या इंडस्ट्रीमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना असे दाखवले जाते की, त्यांना हिंदी भाषा बोलता येत नाही.”

पुढे ती म्हणाली, “मात्र आता काही अंशी गोष्टी बदलत आहे. मी चित्रपटांमध्ये अजून असे बघितले नाही की, साऊथ इंडियन कलाकार खराब हिंदी बोलतात. कदाचित बॉलिवूडमध्ये लोकांचा असा विचार झाला आहे की, साऊथ कलाकरांना हिंदी येतच नाही. आज बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य तंत्रज्ञान बोलवले जाते आणि ते उत्तम काम देखील करतात. प्रतिभेला खूप चांगले व्यासपीठ मिळत असल्याने आनंद देखील होतो.” लवकरच प्रियामणी अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमात दिसणार असून, यात ती अजयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा