16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला तीन वर्षींचा तुरुंगवास ठाेठावण्यात आला आहे. अल्पवयीन अभिनेत्रीसाेबत छेडछाड केल्याने काेर्टाने बुधवारी (दि. 23 नाेव्हेंबर)ला आराेपीला शिक्षा सुनावली. जानेवारी 2019मध्ये लोकल ट्रेन पकडताना पीडित अल्पवयीन अभिनेत्रीचा 32 वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याचा आरोप केला हाेता.
मुंबईत लोकल ट्रेनमध्ये चढत असताना दादर रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन अभिनेत्रीसाेबत ही घटना घडली, याकडे लक्ष देत कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले. गर्दीच्या ठिकाणी अनेक जणांच्या उपस्थितीतही मुली सुरक्षित नाहीत, हे अशा घटनांवरुन दिसून येत असल्याचे निरीक्षण यावेळी काेर्टाने नोंदवले.
दुसरीकडे, आरोपीने तिच्या पुराव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ती एक 16 वर्षीय अभिनेत्री आहे, परंतु स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेले तिचे ओळखपत्र फिर्यादीने दिले नसल्याचे आरोपीच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले होते. महिलांसाठी वेगळा डबा असल्याने तक्रारदार अल्पवयीन मुलीला जनरल कोचमध्ये बसण्याची गरज नव्हती, असंही आरोपीतर्फे सांगण्यात आलं.
ती एक अल्पवयीन अभिनेत्री होती आणि शूटिंगसाठी सेटवर जात असे. पीडितेची तोंडी साक्ष फेटाळण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असं म्हणत 32 वर्षीय आरोपीचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश म्हणाले की, “ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबे आहेत यात शंका नाही. परंतु याचा अर्थ सामान्य डब्यातून फक्त पुरुष प्रवेश करु शकतात आणि महिलांना परवाणगी नाही, असा हाेत नाही, इतर प्रवाशांप्रमाणे महिलाही सामान्य डब्यातून प्रवास करु शकतात. याशिवाय, अभिनेत्रीने सांगितले की, “ती घटनेच्या वेळी मित्रासोबत प्रवास करत होती.” यावर न्यायाधीश म्हणाले की, मुलीने एका पुरुषासोबत जनरल कोचमध्ये प्रवास करण्यात काहीही चुकीचे नाही. (16-years-old-marathi-tv-actress-molested-by-32-years-man-on-mumbai-dadar-railway-station-gets-3-years-imprisonment)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! लेखक सतीश बाबू यांचे निधन, मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने खळबळ
बिग बॉसच्या घरात मराठी मानसाने जिंकले प्रेक्षकांचे मन, शिव ठीकरेवर कौतुकाचा वर्षाव