प्रसिद्ध मल्याळम लेखक सतीश बाबू यांचे गुरुवारी (दि. 24 नाेव्हेंबर)ला निधन झाले. वयाच्या 59व्या वर्षी सतीश बाबू यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश बाबू हे संध्याकाळी तिरुअनंतपुरम येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. मृत्यूचे कारणे समजू शकले नाहीत. सतीश बाबू हे आपल्या पत्नीसोबत वांचियूर येथील मातृभूमी रोडवरील फ्लॅटमध्ये राहत होते. लेखकाच्या मृत्यवेळी त्यांची पत्नी माहेरी गेली हाेती. घरातून कुणाचाच आवज येत नसल्याने आणि लेखक फाेन उचलत नसल्याने घराचा दरवाजा ताेडून घरात प्रवेश केला त्यानंतर लेखक मृतावस्थेत आढळले.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश बाबू (satheesh babu ) यांच्या मृत्यूचे खरे कारण पाेस्ट माॅर्टम रिपाेर्ट आल्यानंतर कळेल. लेखकाचा मृत्यू अनैसर्गिक मृत्यू असल्याची नाेंद करण्यात आली आहे. लेखकाला मृत्यूनंतर सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले हाेते.
लघुकथा लेखक आणि कादंबरीकार सतीश बाबू पय्यान्नूर यांचा जन्म 1963 मध्ये पाथीरीपाला, पलक्कड येथे झाला. कन्हनगड नेहरू कॉलेज आणि पय्यानूर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी कथा, कविता आणि निबंध लेखनात आपली प्रतिभा दाखवली. महाविद्यालयानंतर त्यांची पहिली नोकरी स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमध्ये होती. ‘कासारगोड’ या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले.
पेरामराम या कथासंग्रहासाठी त्यांना 2012 मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांना करूर पुरस्कार, मलायाथूर पुरस्कार आणि थोपिल रवी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ते केरळ साहित्य अकादमी आणि केरळ फिल्म अकादमीचे सदस्य होते आणि त्यांनी अनेक दूरचित्रवाणी चित्रपट आणि माहितीपटांचे दिग्दर्शन केले होते. केरळ संस्कृती विभागांतर्गत भारत भवनचे सचिव म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले होते. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या नक्षत्रकुदरम आणि ओह फॉबी या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या.( writer satheesh babu passes away at 59 age mrj)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वेडचा टीझर रिलीज, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
बिग बॉसच्या घरात मराठी मानसाने जिंकले प्रेक्षकांचे मन, शिव ठीकरेवर कौतुकाचा वर्षाव










