Thursday, April 25, 2024

बिग बॉसच्या घरात मराठी मानसाने जिंकले प्रेक्षकांचे मन, शिव ठीकरेवर कौतुकाचा वर्षाव

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ मध्ये रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे, गुरुवार (दि, 24 नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये टीना दत्ता, शालिन भनोट आणि सुंबुल तौकीर यांच्यामध्ये वाद काय संपण्याचे नाव घेत नाही. सुंबुलच्या वडीलांनी देखिल नको त्या गोष्टी फोन कॉलवर केल्यामुळे यांच्यामध्ये चांगलीच भांडणे पेटली.

वादग्रस्त कार्यक्रमामध्ये अजूनच वाद होताना पाहायला मिळाले. सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) हिच्या वडीलांनी तब्येत ठिक नसल्यामुळे तिच्याशी संवाद साधण्यासाठी बिग बॉसची परवानगी घेतली. मात्र, त्या दोघांमध्ये बाहेरच्या सोडून घरातल्याच गोष्टींवर जास्त चर्चा केली, त्यांनी नॉमिनेशबद्दल प्ल्रनिंग केल्याचे दिसून आले आणि शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Dutta) यांच्या विषयी अपशब्दांचा वापर केला. त्यामळे बिग बॉसही चांगलेच संतापले होते.

बिग बॉसने सर्व सदस्यांना तो फोन कॉल एकण्यास दिला. त्यानंतर सुंबुलच्या वडिलांनी केले भाषण ऐकूण शालीन भनोट आणि टीना दत्ता चांगलेच भडकतात. त्यांच्या बोलण्यामुळे सुंबुल खूपच रडते आणि तिला लगेच डॉक्टरांकडे पाठवण्यात जाते. ती एकटीच पडल्यामुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) याने तिला सांभळले आणि तिची काळजी घेतली. शिवच्या अशा स्वभावाने पुन्हा एकदा त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे. शिवने सुंबुलच्या डोक्यावर हात फिरवून तिची समजूत काढली. मोठ्या भावासारखे जशी समजूत काढली आहे, ते फक्त एक मराठी माणूसच करु शकतो. शिवच्या दिलदारपणा आणि स्वभाव इथे दिसून आला

 

View this post on Instagram

 

बिग बॉसच्या या भागाचा एक व्हिडिओ क्लीप तुफान व्हायरल होत असून सोशल माडियावर शिव ठाकरेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ट्वीटरवरही याबद्दल अनेक कमेंट करत आहेत. शिव जो सुंबुलला बोलला आहे त्याच्या बोलण्याशीही चाहते सहमत आहेत. शिवने सुंबुलच्या वडिलांबद्दल जे बोलले की, सुंबुलचे वडीलही आपल्या जाग्यावर बरोबर आहेत. प्रत्येक मुलीच्या वडीलांनी असेच केले असते. त्यामुळे सोशल मीडयावर शिवला चांगलाच पाठिंबा मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला अटक, 5 लाख रुपयाचे दागिने चोरी केल्याचा आरोप
मोठी बातमी! अभिनेत्री रिचा चड्ढा विरोधात पोलिसात तक्रार

हे देखील वाचा