धक्कादायक! एनसीबी अधिकारी बनून धमकावल्या प्रकरणी २ आरोपी गजाआड, नैराश्यात जाऊन अभिनेत्रीने केली आत्महत्या


बनावट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी बनून एका भोजपुरी अभिनेत्रीला धमकावल्याप्रकरणी, मुंबईतील आंबोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांवर आरोप आहे की, त्यांनी भोजपुरी अभिनेत्रीला खोटे एनसीबी अधिकारी बनून त्रास दिला आणि ब्लॅकमेल केले, त्यामुळे अभिनेत्रीने आत्महत्या केली.

सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे या दोन आरोपींनी २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला एनसीबी अधिकारी बनून एका पार्टीत पकडले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी अभिनेत्रीकडे ४० लाख रुपयांची मागणीही केली होती. त्यानंतर २० लाख देण्याचा निर्णय झाला. (2 accused arrested for threatening actress by becoming ncb officer upset actress committed suicide)

भोजपुरी अभिनेत्री अझीम काझी आणि आणखी एका तरुणासोबत हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होती. यादरम्यान स्वतःला एनसीबीचे अधिकारी सांगणारे दोन्ही आरोपी तेथे पोहोचले. अभिनेत्रीसोबत आलेल्या दोन्ही तरुणांना या आरोपीला गाठले होते आणि त्या चौघांनी मिळून अभिनेत्रीला फसवण्याचा कट रचला.

यादरम्यान अभिनेत्री सतत पैशांच्या मागणीमुळे नैराश्यात गेली आणि २३ डिसेंबरच्या रात्री तिने जोगेश्वरी येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०६, १७०, ४२०, ३८४, ३८८ आणि ३८९, ५०६, १२० ब अन्वये दोन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी सध्या फरार आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!