कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव


कलाकार आणि फॅन्स यांचे नाते खूपच वेगळे आणि हटके आहे. कलाकारांवर फॅन्सचे भरभरून प्रेम असते. कलाकार आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी ते अनेकदा सेटवर, त्याच्या घराबाहेर पोहचतात आणि त्यांच्याबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त करतात. कलाकारांबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स अनेकदा वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या कलाकारांच्या सिनेमात वापरलेल्या वस्तू विकत घेणे आणि आपल्या संग्रही ठेवणे. हो, बऱ्याचवेळा चांगल्या कामांसाठी निधी गोळा करण्याकरता कलाकारांच्या वापरलेल्या वस्तूंचा लिलाव केला जातो. या लिलावात त्यांचे फॅन्स मोठी रक्कम देऊन आपल्या आवडत्या कलाकाराने त्याच्या सिनेमात घातलेली, वापरलेली वस्तू विकत घेतात. यासाठी लाखो रुपये देताना देखील फॅन्स मागेपुढे बघत नाही. आपण अनेकदा या लिलावाच्या बातम्या ऐकल्या असतील आज या लेखातून आम्ही तुम्हाला कोणत्या कलाकाराच्या कोणत्या वस्तू किती रुपयांना विकल्या गेल्या ते सांगणार आहोत.

अक्षय कुमार :
अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘ओह माय गॉड’ सिनेमातील त्याने घातलेला सूट सर्वांनाच खूप आवडला. काही काळाने या सुटीचा लिलाव करण्यात आला आणि तब्ब्ल १५ लाख रुपयांना हा सूट विकला गेला होता.

akshay kuamar
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/viacom 18 movie

आमिर खान :
आमिर खानच्या बहुचर्चित आणि ऑस्करला जाऊन आलेल्या ‘लगान’ सिनेमातील त्याने वापरलेल्या बॅटचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात ही बॅट १.५६ लाखांना विकल्या गेली.

amir khan
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/movie part time

शाहरुख खान :
किंग ऑफ बॉलिवूड हा किताब मिळालेल्या शाहरुखचे संपूर्ण जगात कोट्यवधी फॅन्स आहे. त्याची एखादी वस्तू आपल्याकडे असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. असेच शाहरुखचे एक डूडल पेंटिंग तब्ब्ल २ लाख रुपयांना विकल्या गेले.

srk
srk paintaing

सलमान खान :
भाईजान अर्थात सलमान खान म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी देवच जणू. सलमान आणि त्याचे फॅन्स पाहून कलाकरांना देखील हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. सलमानचा ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमातील ‘जिने के हैं चार दिन’ गाणे सर्वांना आठवतच असेल या गाण्यात सलमानने एक टॉवेल घेऊन डान्स केला होता. हा टॉवेल एका लिलावात १.४६ लाखांना विकला गेला.

salman khan
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/t series

माधुरी दीक्षित :
जगातील सर्वात सुंदर हास्य असणाऱ्या माधुरीचे चाहते इंडस्ट्रीमध्ये देखील खूप आहेत. माधुरीचा हिट सिनेमा असलेल्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘मार डाला’ गाणयातील हिरव्या रंगाच्या लेहेंग्याचा जेव्हा लिलाव झाला तेव्हा हा लेहेंगा ३ कोटींना विकला गेला.

madhuri dixit
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/eros now movie

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!