एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात


अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफसोबत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील अतिशय हिट जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेते अनिल कपूर. चित्रपटांसोबतच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील मैत्रीचे देखील किस्से देखील अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. ‘राम लखन’ या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. पण एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरच्या १७ वेळा कानशिलात लागावली होती. हा किस्सा जवळजवळ ३० वर्षांपूर्वीचा आहे.

दरम्यान ‘परिंदा’ या चित्रपटाविषयी बोलताना जॅकी श्रॉफ यांनी १७ वेळा अनिल कपूर यांच्या कानशिलात लगावल्याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता. हा किस्सा ‘परिंदा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला. ज्यामध्ये जॅकी यांना अनिल कपूर यांना कानशिलात मारायची होती. या मुलाखतीमध्ये जॅकी श्रॉफ म्हणाले, “पहिल्या सीनमध्ये तो सीन योग्य पद्धतीने शूट झाला होता. मात्र अनिल कपूर यांना सीन परफेक्ट हवा होता. त्यासाठी मी त्याच्या १७ वेळा कानशिलात लगावली होती.’

पुढे ते म्हणाले, “मी पहिल्यांदा त्याला कानशिलात मारली आणि दिग्दर्शकाने पटकन सीन ओके केला. पण अनिल कपूरला तो सीन फारसा आवडला नाही. तो मला म्हणाला की, तू फार प्रेमाने मारतोस, जोरात मार आणि त्याने पुन्हा शॉर्ट रेडी करायला सांगितला. त्याला तो सीन प्रभावी आणि जिवंत बनवायचा होता.

जॅकी श्रॉफ पुढे म्हणतात, “अनिलला हा शॉर्ट आवडला नव्हता या कारणामुळे मला त्याला १७ वेळा कानशिलात मारावी लागली. त्याला एवढे मारणे मला अजिबात आवडले नव्हते पण त्याला तो शॉट चांगला येण्यासाठी मला मारावे लागले. जर मी हवेमध्ये मारले असते तरी त्याचे समाधान झाले नसते आणि तो सीन परफेक्ट मिळाला नसता.”

अनिल आणि जॅकी यांनी ‘राम-लखन’, ‘त्रिमूर्ति’, ‘कर्मा’, ‘रूप की रानी चोरो का राजा’, ‘लज्जा’, ‘परिंदा’, ‘काला बाजार’, ‘कभी ना कभी’ असे अनेक हिट आणि अविस्मरणीय चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीला खूप पसंदी देखील मिळाली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!