आपल्या मनमोहक अदांनी ‘या’ अभिनेत्रीने पाडली होती प्रेक्षकांना भुरळ, ओडिशात शुटिंग दरम्यान झाला होता बलात्काराचा प्रयत्न


अर्चना जोगळेकर ही चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री तसेच नर्तिका देखील आहे. तिने मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिथूनच ती नावारूपाला आली. तिने संस्कार, एका पेक्षा एक आणि अनपेक्षित ह्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक कथक नृत्यांगना तसेच कोरीओग्राफर देखील आहे. तिच्या आईने 1963 मध्ये मुंबईमध्ये डान्स स्कूल अर्चना नृत्यालयाची सुरूवात केली होती.

अर्चना जोगळेकर ही आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्चनाचा जन्म 1 मार्च 1965 मध्ये एका मराठी कुटुंबात झाला होता.

अर्चना ही 90 व्या शतकातील सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. तिला तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम करून खूप नाव देखील कमावले. परंतु लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली.

अर्चनाच्या बाबतीत माध्यमांकडून एक खूपच धक्कादायक बातमी समोर आली होती. ती म्हणजे 30 नोव्हेंबर 1997 मध्ये जेव्हा ती ओडिशामध्ये एका चित्रपटाचया शूटिंग करत असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. त्या व्यक्तीला नंतर अटक देखील करण्यात आली होती.

चित्रपटांबरोबरच अर्चनाने अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये देखील काम केले आहे. तिने चूनौती, कर्मभूमी, फुलवंती, किस्सा शांती का, चाहात ओर नफरत यांसारख्या सीरिअल्समध्ये काम केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.