राम चरण अभिनीत पेड्डी हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मात्र याच दरम्यान या चित्रपटात संबंधित एक गोष्ट चर्चेत आली आहे ती म्हणजे जान्हवी कपूर यामध्ये काम करत आहे तिने केलेल्या यातील कामामुळे प्रेक्षक नाराज आहे. आणि अनेक सोशल मीडिया युझर्सनी अभिनेत्रीला लक्ष्य केले आहे, तर काहींनी दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्यावर टीका केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या विषयावर उघडपणे बोलत आहेत. अनेक कलाकारांनी ‘पेड्डी’मधील जान्हवीच्या भूमिकेबद्दल आधीच नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया युझर्सच्या मते, निर्मात्यांनी जान्हवीला केवळ एक वस्तू म्हणून वापरले आहे आणि चित्रपटात तिचे अति-लैंगिकीकरण केले आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहेत तर आता आश्यातच पेड्डी मधील सहकलाकार जगपती बाबू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रंसगावर आता दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी यासाठी माफीही मागितली आहे आणि आता ‘पेड्डी‘(peddi)मध्ये दिसलेल्या जगपती बाबू यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत जान्हवी कपूरचा बचाव केला आहे. याप्रकरणावर जगपती बाबू यांनी म्हणले की, जान्हवीने दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणेच केले त्यामुळे पुर्ण पणे तिला दोष देणे चुकीचे आहे. मी तिच्या पाठीशी आहे. तिला या बाबतीत दोष देणे थांबवा असे त्यानी म्हणले आहे.
या प्रकरणावर या दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी माफी मागितली आहे. आणि ते एक पोस्ट शेअर करून म्हणले की मला महिलाबाबत प्रंचड आदर आहे. ते ते जान्हवीची वादग्रस्त दृश्ये पूर्णपणे बदलतील आणि मला माफ करा. हे जरी वाद असले तरी हा चित्रपट उत्तम गाजत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बॉक्स ऑफिसवर ‘पेड्डी’चा धुमाकुळ; अवघ्या चार दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार









