Tuesday, September 15, 2026
Home बॉलीवूड गूढ हत्या, थरार आणि रहस्यांनी भरलेली ‘इन्स्पेक्टर ऋषी’, शेवट पाहून उडेल झोप

गूढ हत्या, थरार आणि रहस्यांनी भरलेली ‘इन्स्पेक्टर ऋषी’, शेवट पाहून उडेल झोप

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. तसेच हॉरर-सस्पेन्स कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात कारण त्या भीती, तणाव, गूढता आणि थरार निर्माण करतात आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात; प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांच्या मनात “आता पुढे काय होणार हा मनात प्रश्न सुरु राहतो. तर चला मग अशाच एका सिरीजबाबत जाणुन घेवुया.

या सिरिजचे नाव म्हणजे ‘इन्स्पेक्टर ऋषी’ आहे. आणि ही एक मालिका एका अशा पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे ज्याच्यावर एकामागून एक घडणाऱ्या गूढ हत्यांचे रहस्य उलगडण्याची जबाबदारी सोपवली जाते. हि मालिकेत एका छोट्याश्या गावातील हि कहाणी आहे.

या मालीकेची निर्मिती आणि दिग्दर्शन जे.एस. नंदिनी यानी केली आहे. तर मालीकेचा पुढचा भाग येणार आहे. आणि ही मालिका ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हिंदी व तमिळसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. या मालिकेला IMDb वर ७.२ रेटिंग मिळाले आहे. नवीन चंद्रा यांच्याव्यतिरिक्त यात सुनैना, कन्ना रवी, श्री कृष्ण दयाल, मालिनी (malini)जीवरात्नम आणि कुमारवेल यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बाळाच्या आगमनापूर्वी नवीन घर पाहण्यासाठी पोहचले दीपिका आणि रणवीर सिंग, दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

हे देखील वाचा