Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड जेव्हा दुखापतग्रस्त बिग बींनी इंदिरा गांधींना म्हटले होते ‘आँटी मला झोपच लागत नाहीये’, ‘असे’ मिळाले होते प्रत्युत्तर

जेव्हा दुखापतग्रस्त बिग बींनी इंदिरा गांधींना म्हटले होते ‘आँटी मला झोपच लागत नाहीये’, ‘असे’ मिळाले होते प्रत्युत्तर

बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आणि ते चित्रपट हिट देखील झाले. सेटवर त्यांचे वागणे, अभिनय एकूणच सगळ्या गोष्टी ते खूप चांगल्या रीतीने हाताळत असे. त्यांनी अनेक फाईट सीन देखील खूप चांगल्याप्रकारे निभावले आहेत. पण कुली चित्रपटाच्या सेटवर असाच एक फाईट सीन करताना त्यांना खूप मोठी दुखापत झाली होती. ही गोष्ट संपूर्ण चित्रपचसृष्टी आजही विसरू शकली नाही.

कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका फाईट सीनमध्ये दिग्गज अभिनेते पुनीत इस्सर यांचा बुक्का चुकून अमिताभ बच्चन यांच्या पोटात बसला होता, यामुळे ते अगदी मृत्यूच्या दारात होते. त्यावेळी सर्व डॉक्टर्सला देखील ते वाचतील की, नाही याची शाश्वती नव्हती.

अमिताभ बच्चन हे हॉस्पिटलमध्ये आहेत ही गोष्ट जेव्हा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांना बिग बींबद्दल खूपच काळजी वाटू लागली होती. ही गोष्ट अनेकांना माहीत नसेल पण अमिताभ बच्चन यांचे गांधी कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते. त्यावेळी ते इंदिरा गांधी यांना आँटी म्हणत असे. माध्यमांच्या माहितीनुसार इंदिरा गांधी त्यावेळेस अमेरिकेमध्ये होत्या.

अमेरिका दौरा संपल्यानंतर इंदिरा गांधी सगळ्यात आधी अमिताभ बच्चन यांना भेटायला मुंबईमध्ये आल्या होत्या. त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये आल्या, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना म्हणाले की, ‘आँटी मला झोपच लागत नाहीये.’ त्यावेळी त्या म्हणाल्या की, ‘काळजी करू नकोस, मला पण कधी कधी असंच होतं, मलाही झोप लागत नाही.’ अमिताभ बच्चन सोबत झालेल्या या घटनेमुळे ते कोमामध्ये गेले होते. डॉक्टरांनी त्यांना ‘क्लिनिकल डेड’ असे देखील घोषित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप

हे देखील वाचा