Saturday, April 20, 2024

‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप

सोमी अली ही पाकिस्तानी वंशाची एक अमेरिकन अभिनेत्री आहे, जिने सलमान खानचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ पडद्यावर पाहिला, आणि तेव्हापासून तिचा सलमानवर क्रश होता. त्यावेळी सोमी अवघ्या १६ वर्षांची असावी. तिनं आपल्या क्रशला, प्रेमात रुपांतर करण्याचे स्वप्न बघत तिने अमेरिकेतील फ्लोरिडा शहर सोडलं, आणि ती भारतात आली. सलमानला शोधून त्याच्याशी लग्न करावे यासाठी फिल्म इंडस्ट्रीत ती काम करु लागली. सलमानसोबत ८ वर्ष डेटिंग करत होती. हे सर्व तिने स्वप्न पाहिले, त्याप्रमाणे होऊ लागले होते. पण शेवटी, एक वेळ अशी आली ,की जेव्हा ते दोघे विभक्त झाले, आणि आपआपल्या वाटेने पुढे गेले.

सलमान खानच्या ब्रेकअपवरून सोमी अलीने आता तिचे मौन तोडले आहे, आणि अभिनेता सलमानने तिची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तथापि, सोमीने यापूर्वी सांगितले आहे की, ऐश्वर्या रायने सलमान आणि तिच्यादरम्यान एंट्री घेतली होती.

सलमान खान सोमी अलीचा पहिला प्रियकर होता. नुकतचं सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मुलाखत देणाऱ्या या अभिनेत्रीने, त्यावेळीच्या तिच्या ब्रेकअपबद्दलच बरेच काही सांगितले आहे. एका दिलेल्या मुलाखतीत तिने सलमानवर ८ वर्ष डेटिंग करत असताना, फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. या ब्रेकअपने सोमी अलीला इतके खचवले, की तिने बॉलिवूडमधील करिअर सोडण्याचा निर्णय घेतला, आणि ती अमेरिकेत परत गेली.

सोमी अली म्हणाली, की ती गेली अनेक वर्षे सलमान खानच्या संपर्कात नव्हती. ती चित्रपटासाठी भारतात आली नव्हती, तर सलमानसाठी आली होती. आणि जेव्हा या नात्यात तिची फसवणूक झाली, आणि हे संबंध टिकले नाहीत, तेव्हा तिने बॉलीवूड कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी तिच्या जुन्या मुलाखतीत सोमीने ऐश्वर्या रायला तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते.

अनेक वर्षांपूर्वी सोमी अलीला मुलाखतीत विचारलं होते की- “तिच्या आणि सलमानमध्ये कोण आल आहे?” तर त्याला प्रतिसाद म्हणून अभिनेत्रीने ‘ऐश्वर्या रायचे’ नाव घेतले. तथापि, तिने असे म्हटले आहे, की यासाठी ती कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. सोमी म्हणाली होती, ‘काहीही नाही, दोघांनी त्यावेळी जे योग्य वाटले ते केले. माझं  कोणाशीही वैर नाही.’

सोमी अली म्हणते, कि नात्यांच्या बाबतीत ती सलमानकडून माहित नाही काय शिकली , पण त्याच्या घरच्यांकडून ती खुप काही शिकली. ती सांगते कि त्याच्या घरच्यांनी कधीच कोणाचा धर्म बघितला नाही, तर ते कायमच सगळ्यांना सारखी वागणूक देत आले आहेत. सलमान खानची आई सलमा खान हिच्याकडून तर तिला खुप प्रेमळ वागणूक मिळाली, सलमान खानचे घर कायमच सगळ्यांसाठी खुले राहिले आहे.

हे देखील वाचा