Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

‘एक हजारो में मेरी बेहना है’ या मालिकेतून निया शर्मा घराघरात पोहोचली. आपल्या कार्यक्रमात साधी आणि सोज्वळ दिसणारी निया खऱ्या आयुष्यात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकली, तर ती किती हॉट आहे याचा आपण अंदाज नक्कीच बांधू शकतो. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नियाने सोशलवर आपले फोटो टाकले, आणि त्यावर चाहत्यांनी कमेंट केली नाही असे कधीच झाले नाही. तिचे प्रत्येक फोटो हे लक्षवेधी असून तिचा लूक भल्याभल्यांना भारावून सोडणारा आहे.

निया आपल्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. बहुतेक वेळा ती आपल्या फोटोमूळे गोत्यात देखील आली आहे. तिने केलेल्या फोटोशूटमुळे तिला काही वेळा नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. पण त्यांच्या ट्रोलिंगला न जुमानता त्याचे प्रत्युत्तर ती आपल्या नवीन फोटोतून देताना दिसते. सध्या नियाचा एक नवीन व्हिडिओ सोशलवर अक्षरशः राडा घालत आहे. यात ती आपल्या मैत्रिणीसोबत सामसूम ठिकाणी भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. त्यात तिच्या सोबत तिची मैत्रीण श्वेता शारदा ही तिला चांगलीच साथ देत आहे.

नियाच्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तिच्या या डान्सचे कौतुक करायला चाहते विसरत नाहीयेत. काहींनी तर तिला या व्हिडिओवरून ट्रोल केले आहे. एका चाहत्याने तिचा उल्लेख लेडी डॉन म्हणून केला आहे, तर दुसरीकडे एका चाहत्याला श्वेता शारदाचा लूक आवडला आहे. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी पाहिला आहे. या अगोदरही तिने आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोच्या माध्यमातून सर्वांनाच घायाळ करून सोडले आहे.

रिया सन २०१७ मध्ये ती ‘आशियातील सेक्सी महिला’ या यादीत तिसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर २०१८ साली तिने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. लंडनमधील ‘इस्टर्न आय’ या मॅगझीनने ही यादी जाहीर केली होती.

‘एक हजारो में मेरी बेहना है’ या मालिकेत भरघोस यशानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली होती. त्याचप्रमाणे ती ‘बिग बॉस’ सिजनच्या आठव्या पर्वात दिसली होती.

‘नागीण’ या मालिकेत तीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ‘जमाई राजा २.०’ ही मालिका नुकतीच ओटीटीवर रिलीझ झाली होती. त्यासोबतच ती ‘खतरों के खिलाडी’ या मालिकेत देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नागीण’ फेम निया शर्माच्या बोल्ड अदांनी घातली काळजात घाव!! चाहत्यांकडून फोटो आणि व्हिडिओला मिळतोय खूपच वाव

-महिला दिनाचे औचित्य साधून सनी लिओनीने केला व्हिडिओ शेयर, म्हणाली ‘माझा नेहमी तिरस्कार…’

-जान्हवीच्या मॅनेजरने केला चाहत्यासोबत गैरव्यवहार; पाहून जान्हवीने केले असे काही, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा