महिला दिनाचे औचित्य साधून सनी लिओनीने केला व्हिडिओ शेयर, म्हणाली ‘माझा नेहमी तिरस्कार…’


टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत कर्तृत्ववान महिला म्हणून आज सनी लिओनी फारच आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर एक पाऊल पुढे टाकले आहे. कोणालाही न जुमानता आणि टीकाकारांच्या अनेक प्रश्नांना ती सामोरे गेलेली आहे. आज तिची गणना यशस्वी महिलांमध्ये होते. बिग बॉसमधून ओळख मिळालेली सनी आपल्या हॉट आणि कातिल अदांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. पण तिचा हा इथपर्यंतचा प्रवास काही साधा नव्हता. आपल्या आयुष्यात तिला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. या गोष्टींचा उलगडा तिने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केला.

सनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती म्हणतेय की, “मी जेव्हा एकविसाव्या वर्षी पदार्पण केले, तेव्हा लोक माझ्यावर नेहमीच संताप व्यक्त करायचे. माझा नेहमीच तिरस्कार व्हायचा. मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळाले, तेव्हा मला कोणीच सपोर्ट देखील केला नाही. एवढच नव्हे तर मला कोणीच पसंत करत नव्हते. याशिवाय मला इंडस्ट्रीमधून हद्दपार करण्यात आले होते. तरीही मी पराभव स्वीकारता प्रयत्न करू लागली. आणि आज माझ्याकडे सगळं आहे. माझ्या मेहनतीच्या जोरावर मी इतकं सगळं साध्य केलेे आहे.”

आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती महिलांना एक संदेश देते की, “कोणाचाही विचार न करता आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची ही वेळ आहे. तुम्ही तयार राहा. मी खूप रिअलिस्टिक असून आपण चांगली व्यक्ती कसे बनून राहू याकडे माझे लक्ष असते.” महिला दिनाच्या दिवशी चित्रीत केलेला सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे, तर काही जण प्रतिक्रियाही देत आहेत.

हा व्हिडिओ फार मजेदार आहे. ती आपल्या हावभावाने चाहत्यांच्या मनावर राज्य करायला चुकत नाही आहे. आपल्या मोहक अंदाजाने ती चाहत्यांना आकर्षित करत असते. आपला हॉट आणि ग्लॅमरस लूक दाखवून देण्याची कोणतीही संधी ती सोडत नाही आहे.

ऍडल्ट इंडस्ट्रीतून मुख्य प्रवाहातील चित्रपटात तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार वेळ लागला. आज ती एक उत्तम व्यावसायिक आहे. दरम्यान तिने एका मुलीला दत्तक घेतल्यामुळे बरीच चर्चेत आली होती. आपली मेकअप लाईन तिने कमी कालावधीत निर्माण केली आहे. या माध्यमातून ती आपला व्यवसाय भारत आणि अमेरिकेत चालवते.

नुकताच तिने आपला एक हॉट फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता, ज्यात ती पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. तिच्या या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर चाहत्यांमार्फत लग्नाच्या मागण्या देखील आल्या.

सन २०१२ मध्ये सनीने ‘जिस्म टू’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु ती प्रकाशझोतात आली ती बिग बॉसच्या पाचव्या पर्वात. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटात तिने आयटम साँग देखील केले आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर तमिळ तेलुगु मल्याळम बंगाली आणि नेपाळी अशा अनेक भाषांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चमक दाखविली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.