बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘मौनी रॉय’. मौनीने सन २००७ मध्ये ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून टीव्हीवरील आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक मालिकेत काम केले. त्यानंतर तिने सन २०१८ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या सुंदरतेमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती आपले बोल्ड फोटोही शेअर करत असते. नुकतेच तिचे काही नवीन फोटो व्हायरल होत आहेत.
मौनीने दोन दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती एकदम हटके आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.
मौनीने फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. प्रेक्षकांनीही तिची सुंदरता पाहून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये मौनीने समुद्रकिनारी फोटोशूट केले असून तिने लाल बिकिनी घातली आहे.
मौनीच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून लाईक्स मिळत आहेत. तसेच तिच्या सुंदरतेची प्रशंसाही केली आहे. मौनी मागील काही महिन्यांपासून आपल्या नवनवीन फोटोंमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहे.
तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, ती अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुपरहिट सिनेमे दिलेली बॉलीवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, फोटो पोस्ट करत दाखवले बेबी बंप-तमिळ अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशूटने कियारा आडवाणीलाही टाकले मागे; फोटो होतायत जोरदार व्हायरल










