‘आयेशा’, ‘ये साली जिंदगी’, ‘मोहंजोदाडो’ ,’जिस्म २’ आणि ‘मै तेरा हिरो’ या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता अरुणोदय सिंग हा दिवंगत मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंग यांचा नातू. अरुणोदयचे फिल्मी करियर म्हणावे तितके यशस्वी ठरले नाही. मात्र आपल्या लव्ह लाईफमुळे तो बराच चर्चेत राहिला आहे.
शिक्षणासोबतच तो नाटकात देखील काम करतो. एकदा त्याने हॉलिवूड अभिनेता मार्लेन ब्रोडोचा ‘ऑन द वॉरफ्रंट’ हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्याने मनापासून अभिनेता व्हायचे ठरवले आणि न्यूयॉर्क अकादमीमधून अभिनयाचे शिक्षण देखील घेतले. सन २००९ मध्ये सिकंदर सिनेमापासून त्याने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरवात केली. काही चित्रपटात तो जरी छोट्या भूमिकेत दिसला तरी त्याच्या या अभिनयाने चाहत्यांवर छाप सोडली होती. नुकतीच आलेली एकता कपूरची ‘अपहरण’ ही त्याची वेब सिरीज ही प्रचंड गाजली.
अरुणोदय सिंग हा अडीच वर्षांपासून कॅनडाच्या एल्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. गोव्यातच या दोघांची भेट झाली होती. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व एकमेकांना ते डेट करू लागले. एल्टन ही गोवास्थित एका कॅफेची मालकीण असून व्यवसायाने शेफ आहे. इतकी वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी १५ नोव्हेंबर २०१६ मध्ये आपल्या नात्याचे लग्नात रूपांतर करून सप्तपदी घेतल्या. भोपाळमध्ये झालेल्या या विवाहात अरुणोदयचे जवळचे मित्र, सावकार, अभिनेता गौरव कपूर आणि अनके तारकांनी हजेरी लावली होती. चक्क ५०००० आथितींना त्याने आपल्या लग्नसमारंभात आमंत्रित केले होते.
आपल्या लग्नात त्याने खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी विशेष गाड्यांची देखील व्यवस्था केली होती. कोलकाता येथील कारागिरांनी या लग्नासाठी विशेष लग्नाचे पंडाल देखील सजवले होते. त्यासोबतच लग्नाच्या ठिकाणी अनके प्रोजेक्टर देखील बसविण्यात आले, जेणेकरून वेगवेगळ्या पंडालमध्ये बसलेल्या लोकांना आपल्या लग्नाच्या सर्व विधी तिकडून दिसू शकतील. त्याच्या सर्व लग्नसमारंभाचे सर्व फोटो त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेयर केले होते. परंतु त्यांचे हे लग्न फार कमी काळ टिकलं.
लग्नाच्या काही वर्षांनी या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि दिवसेंदिवस खटके उडू लागले. विशेष म्हणजे हे वाद अगदी छोट्या छोट्या कारणांमुळे व्हायचे. असे म्हटले गेले आहे की त्यांच्या ह्या वादाचे कारण कुत्रा हे असून या वादाला दोघांनी अधिकच पर्सनली घ्यायला सुरवात केली आणि हे वाद अधिकच वाढत गेले, त्यामुळे २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
एल्टनपासून विभक्त झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर शेयर करत असताना अरुणोदयने लिहिलं की, ” मी काही दिवस लिहीत नव्हतो, आणि यामागे एक अतिशय वाईट कारण आहे. माझं लग्न अखेर संपुष्टात आले. आमचं प्रेम खूप चांगले होते पण आम्ही वास्तवातून बाहेर पडू शकलो नाही. मी खूप प्रयत्न करूनही आमच्यात असलेले मतभेद सोडविण्यात मी अयशस्वी ठरलो.”
हेही वाचा-
–आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
–दिलीप कुमारसोबत साखरपुडा अन् किशोर कुमारसोबत लग्न करणारी मधुबालाची या कारणामुळे सोडली सर्वांनी साथ; वाचा मधुबालाची कहाणी