‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा


बॉलीवूडचा जग्गू दादा म्हणजेच ‘जॅकी श्रॉफ’ हे नेहमीच त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे, अभिनयामुळे ओळखले जातात. ६४ वर्षांचे जॅकी अजूनही फिट अँड फाईन आहेत. ३८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८३ साली त्यांनी ‘हिरो’ सिनेमातून मुख्य नायक म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. तेव्हापासून चालू असलेली त्यांची जादू आजतागायत किंचितही कमी झालेली नाही. जॅकी यांना सिनेमात पाहून अनेक तरुणी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या, तसे पाहिले तर आजही काही वेगळी परिस्थिती नाहीये. त्यांचा या वयातही असणारा फिटनेस पाहून अनेक तरुणांना प्रेरणा मिळते.

जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आणि त्यांच्या फॅन्सला माहितच आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला या लेखातून जॅकी श्रॉफ, त्यांच्या पत्नीचा आणि जॅकी श्रॉफ यांच्या एक्स गर्लफ्रेंड यांचा एक जास्त कोणालाही माहित नसलेला मजेशीर किस्सा सांगणार आहोत. सध्या सोशल मीडियावर जग्गू दादा आणि त्यांची पत्नी आयेशा यांचा मुलाखतीचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

अनेक वर्षांपूर्वी जेव्हा जग्गू दादा सिनेमातही काम करत नव्हते, तेव्हा एकदा ते एका रस्त्याच्या किनारी उभे होते, आणि अचानक त्यांची नजर १३ वर्षाच्या शाळेचा गणवेश घातलेल्या एका मुलीवर पडली. ती मुलगी बसमध्ये बसलेली होती, तिला पाहताचक्षणी जग्गू दादा तिच्या प्रेमात पडले. जग्गू दादांनी त्या मुलीजवळ जाऊन तिला तिचे नाव विचारले आणि म्हणाले, मी एका रेकॉर्डिंग स्टोरकडे जात आहे तुला माझ्यासोबत यायला आवडेल का? त्या मुलीने होकार दिला आणि ते स्टोरमध्ये गेले. तिथे त्यांनी त्या मुलीला एक म्युझिक अल्बम खरेदी करायला मदत केली. ही मुलगी दुसरी कोणी नाही जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा दत्त होती.

त्यांच्या पहिल्याच भेटीनंतर दोघे एकमेकांकडे प्रचंड आकर्षित झाले होते. त्यांचे हे नाते लवकरच प्रेमात बदलले. मात्र, त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास अनेक प्रकारे अवघड होता. त्यातलीच एक मुख्य समस्या म्हणजे, जॅकी श्रॉफ आधीपासूनच एका मुलीच्या प्रेमात होते, आणि ती मुलगी अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. ती पुन्हा परतल्यावर जॅकी श्रॉफ आणि ती मुलगी लग्न करणार होते. त्यांनी ही गोष्ट आयेशा यांना सांगितली.

हे सर्व ऐकल्यानंतर आयेशा यांच्या समोर दोनच पर्याय होते, एकतर त्यांनी जॅकी श्रॉफ यांना विसरावे नाहीतर जॅकी यांच्या गर्लफ्रेंडला जॅकी आणि त्यांच्याबद्दल खरे सांगावे. आयेशा यांनी दुसरा पर्याय निवडला आणि त्यांच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहिले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, त्या जॅकी श्रॉफ यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना जॅकी यांच्यासोबत लग्न करायचे आहे.

विशेष म्हणजे त्यांनी या पत्रात अजून एक मुद्दा लिहिला तो म्हणजे, “तुम्ही परत भारतात या आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि आयुष्यभर बहिणीसारख्या राहू.” यावर त्यांनी सांगितले होते की, “मी असे लिहिले कारण कोणत्याही गोष्टीसाठी मला जॅकीला गमवायचे नव्हते.” त्यानंतर जॅकी आणि आयेशा यांनी १९८७ मध्ये लग्न केले. या दोघांना आज टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ ही दोन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक
-पारा चढला..!! दिशा पटानीने पुन्हा केले चाहत्यांना क्लिन ‘बोल्ड’, बिकिनीतील फोटोंचा सोशलवर धुमाकूळ
-धोनी सिनेमात सुशांत सिंग सोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, फेसबुकवर शेअर केली सुसाइड नोट


Leave A Reply

Your email address will not be published.