अबब! हृतिक रोशनने मुंबईत दोन फ्लॅट्ससाठी मोजले इतके कोटी रुपये


मुंबई मिररच्या वृत्तानुसार, हृतिक रोशनने जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील ‘मन्नत’ नावाच्या इमारतीत जवळपास ९७ कोटी रुपये खर्च करून दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. त्याच्या या इमारतीतून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येते.

ह्रतिकने तीन मजले मिळून दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत, जे भविष्यात तो एकत्र करू इच्छितो. यातील एक अपार्टमेंट पेन्टहाउस आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या वांद्रे निवासस्थानाचे नाव देखील ‘मन्नत’ आहे.

या वृत्तात असे म्हटले आहे की, हृतिकने या अपार्टमेंटसाठी १.९५  कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. हृतिकने १५ व्या आणि १६ व्या मजल्यावरील २७ चौरस फूट डुप्लेक्ससाठी ६७.५० कोटी रुपये मोजले आहेत, तर  १४ व्या मजल्यावरील अकराशे चौरस फूटाचा दुसरा फ्लॅट ३० कोटींमध्ये खरेदी केला आहे. हा करार एका महिन्यापूर्वीच त्याने पूर्ण  झाला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.