डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

Bollywood Actress Priyanka Chopra Reveals How A Director Once Asked Her To Fix Her Buts Brest And Jaw In Her Memoir Unfinished


आतापर्यंत अनेक दिग्गज मंडळींनी आपली बायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र लिहिले आहे. यामध्ये आणखी कलाकारांचा समावेश दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचाही समावेश झाला आहे. तिने मंगळवारी (९ फेब्रुवारी) आपले ‘मेमोयर अनफिनिश्ड’ हे पुस्तक रिलीझ केले आहे. यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे म्हटले जात आहे.

प्रियांकाने आपल्या या पुस्तकात एका चित्रपट निर्मात्याचा उल्लेख केला आहे, ज्याने तिला सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबत तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तिने या पुस्तकात त्या अफवांवरही लिहिले आहे का, ज्यामध्ये म्हटले होते की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे? यावर प्रत्युत्तर देत प्रियांका म्हणाली की, “मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी हे पुस्तक लिहिलेले नाही.”

प्रियंकाने लिहिले की, “पुरुषप्रधान स्थान असलेल्या मनोरंजन व्यवसायातील मी एक स्त्री आहे, मला इथे खूप सदृढ व्हावे लागले. जेव्हा मनोरंजन करणारे आपल्यातील कमतरता दाखवतात, तेव्हा प्रेक्षकांना त्यांना कमीपणा दाखवण्यात मजा येते. मी आपले काम केले आणि त्या गोष्टींबाबत चर्चा नाही केली ज्यांना मी मागे सोडले आहे.”

माध्यमांतील वृत्तानुसार, प्रियांकाने आपल्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख करत लिहिले आहे की, “जेव्हा मी एका निर्मात्याला (डायरेक्टर/प्रोड्युसर) भेटले, तेव्हा काही वेळानंतर त्याने मला उभे राहून फिरण्यासाठी सांगितले. मीही तसेच केले. ते माझ्याकडे खूप वेळापर्यंत एकटक नजरेने पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी मला म्हटले की, मी ब्रेस्ट सर्जरी (स्तन शस्त्रक्रिया) केली पाहिजे.”

“याव्यतिरिक्त आपले जबडे आणि बटचा आकारही ठीक केला पाहिजे. जर मला अभिनेत्री व्हायचे असेल, तर मला हे सर्व ठीक केले पाहिजे. त्यांनी मला म्हटले की, ते लॉस एंजेलिसमधील एका डॉक्टरला ओळखतात, ज्यांच्याकडे ते मला पाठवतील. या घटनेनंतर मला स्वत:मध्ये कमीपणाची जाणीव होऊ लागली होती,” असेही ती पुढे म्हणाली.

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच तिचा ‘द व्हाईट टायगर’ सिनेमा रिलीझ झाला होता. चाहत्यांकडून या चित्रपटाचे कौतुक करण्यात आले. या चित्रपटात राजकुमार राव आणि गौरव आदर्श यांचाही समावेश होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.