Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड हुश्श! बहुचर्चित ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित; राजकुमार राव- जान्हवी दिसणार मुख्य भूमिकेत, पाहा व्हिडिओ

हुश्श! बहुचर्चित ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित; राजकुमार राव- जान्हवी दिसणार मुख्य भूमिकेत, पाहा व्हिडिओ

राजकुमार राव हा एक प्रतिभावान कलाकार समजला जातो. तो सर्व प्रकराच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे फार कमी काळात राजकुमारने अनेक छटा असलेल्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. याच अभिनेत्याचा २०१८ साली आलेल्या ‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाने बक्कळ कमाई केली होती. आता पुन्हा राजकुमार त्याच्या पुढच्या हॉरर सिनेमातून प्रेक्षकांना हसवायला तयार झाला आहे.

राजकुमारचा ‘रुही’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ट्रेलरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार रावने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले, ‘रुही’चा ट्रेलर स्वत:च्या जोखमीवर पहा, कारण यावेळी ‘मर्द को ज्यादा दर्द होगा’.

तीन मिनिटांचा हा ट्रेलर भरपूर मसाल्याने भरलेला आहे. यात एक डायन दाखवली आहे, जिची नजर लग्न असणाऱ्या घरांवर असते. यात जान्हवी कपूरला या डायनने वश केलेले आहे. जान्हवी यात भुताच्या भूमिकेत दिसत आहे. तिला डायनच्या वशीकरणातून सोडवण्यासाठी राजकुमार राव आणि वरून शर्मा प्रयत्न करताना दाखवले आहे. चित्रपटाची मूळ कथा जरी स्त्री केंद्रित सिनेमासारखी असली तरी त्यात बरेच बदल करण्यात आले आहे.

ह्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख राजकुमार रावने इंस्टाग्रामवर सिनेमाचे पोस्टर शेयर सांगितली आहे. हा सिनेमा येत्या ११ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

जान्हवी कपूरने देखील हा ट्रेलर पोस्ट करत लिहिले, “इस भूतिया शादी में आपका स्वागत है. मॅजिक ऑफ सिनेमा रिटर्न, 11 मार्च को फिल्म रिलीज.” सोबतच वरून शर्माने देखील, “साल की सबसे भूतिया वेडिंग के लिए थिएटर भी हैं रेडी. मॅजिक ऑफ सिनेमा रिटर्न, 11 मार्च को फिल्म रिलीज.” लिहीत ट्रेलर शेयर केला आहे.

ह्या चित्रपटाच्या नावामध्ये अनेकवेळा बदल करण्यात आला. सुरुवातीला जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा या सिनेमाचे नाव ‘रूही अफजा’ होते. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचे नवं बदलून ‘रुही अफसाना’ केले गेले. आता सिनेमाचा ट्रेलर आणि प्रदर्शनाची तारीख समोर येताना या सिनेमाचे नाव ‘रुही’ ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा-
अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या राधे श्याम  सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
बॉलिवूडमध्ये आणखी एका सिक्वलची भर! दिशा पटानीने केली या सिनेमाची घोषणा, पुढच्यावर्षी होणार प्रदर्शित
प्रेमाचा अनोखा रंग दिसणार चित्रपटगृहात, मराठीतील हा सिनेमा १९ फेबला होणार प्रदर्शित

 

 

हे देखील वाचा