अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी


‘बाहुबली’ या सिनेमामुळे भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात ओळख मिळवणारा अभिनेता म्हणजे ‘प्रभास’. प्रभासने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले. मात्र, बाहुबली हा सिनेमा त्याच्यासाठी मैलाचा दगड ठरला. या सिनेमामुळे त्याच्या संपूर्ण करियरला जोरदार कलाटणी मिळाली. या सिनेमानंतर प्रभासचा पुढचा बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे ‘राधे श्याम’. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमासाठी खूपच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाचा टिझर ‘व्हॅलेंटाईन डे’चे मुहूर्त साधत प्रदर्शित झाला आहे.

‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर हा ५३ सेकंदांचा असून, यात प्रभास अतिशय रोमँटिक अंदाजामध्ये दिसत आहे. या टिझरमध्ये प्रभास पूजासोबत रेल्वे स्टेशनवर फ्लर्ट करताना दिसत आहे. टिझरमध्ये प्रभास इटॅलियन भाषेत पूजासोबत रोमँटिक संवाद साधत आहे. पूजा प्रभासला म्हणते, “तू स्वत:ला रोमियो समजतोस.” यावर उत्तर देत प्रभास म्हणतो, “रोमियोने आपल्या प्रेमासाठी जीव दिला. मात्र, मी तसा माणूस नाहीये.”

प्रभास आणि पूजाचा लूक अतिशय सुंदर आणि लक्षवेधी ठरत आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ट्रेंडिगमध्ये टॉपवर आला आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’चे मुहूर्त साधत या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टी-सीरिजने त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून हा टिझर शेयर करत लिहिले, “या व्हॅलेंटाईनला, २०२१ या वर्षातील सगळ्यात मोठ्या घोषणेसह, प्रेमाचा आनंद घेऊया, ३० जुलै २०२१ ला राधे श्याम चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.”

‘राधे श्याम’ हा सिनेमा एक पीरियड रोमँटिक-ड्रामा आहे. बहुभाषिक असणारा हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्रजी आणि तेलुगु भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून, वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद अप्पलापथी आणि भूषण कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

प्रभासच्या कारकीर्दीचा हा २० वा चित्रपट असल्याने त्याच्यासाठी हा सिनेमा अधिकच खास आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ
-‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्री अक्षरा सिंगचे नवे गाणे रिलीझ, चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद
-‘तोंडात पान मसाला टाकून मामींना गाणी बोलायला लावतात अध्यक्ष महोदय’, अमृता फडणवीस नवीन गाण्यावर जोरदार ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.