बॉलिवूडमध्ये आणखी एका सिक्वलची भर! दिशा पटानीने केली ‘या’ सिनेमाची घोषणा, पुढच्यावर्षी होणार प्रदर्शित


मागच्या काही वर्षांपासून बॉलिवूड सिक्वल्सचा खूप ट्रेंड सुरू झाला आहे. एखादा सिनेमा हिट झाला की, लगेच त्याचा सिक्वल काढला जातो. या सिक्वलच्या ट्रेंडमध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या बिग बजेट आणि सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. यात सलमान खानचा ‘दबंग’, आमिर खानचा ‘धूम ३’, शाहरुख खानचा ‘डॉन’ आणि अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.

नुकताच अजून एका हिट सिनेमाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आले आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन’ या सिनेमाचा सिक्वल पुढच्या येणार आहे. नुकतीच या सिक्वलची घोषणा झाली आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ असे या सिक्वल सिनेमाचे नाव असणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख दिशा पटानीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

हे पोस्टर शेयर करताना दिशाने लिहिले, ” यावेळेसही फॅन्सला तक्रारीला जागाच ठेवणार नाही.” मागच्या सिनेमात श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते, तर या वेळेस दिशा पटानी, जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया या सिक्वलमध्ये दिसणार आहे.

मागचा ‘एक व्हिलन’ हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. याच सिनेमातून रितेश देशमुख एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला होता. सोबतच श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ म्हलोत्रा देखील लोकांना खूप आवडले होते. आता या नव्या सिनेमात नक्की काय दिसणार याबद्दल रसिकांमध्ये खूपच उत्सुकता आहे.

दिशाच्या पुढील चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.