गुड न्यूज! कोट्यवधी चाहत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणारी ‘श्रेया घोषाल’ बनणार ‘आई’; बेबी बंपचा फोटो केला शेअर

Singer Shreya Ghoshal Is Pregnant Posting A Picture of Baby Bump On Social Media And Shared Good News


बॉलिवूडमधून आनंदाची बातमी आली आहे. आपल्या आवाजाने चाहत्यांना घायाळ करणारी गायिका श्रेया घोषाल गरोदर आहे. तिने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यानंतर तिच्यावर सेलिब्रिटी तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रेया आणि तिचा पती शिलादित्य मुखोपाद्याय हे आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी खूपच उत्साही आहेत.

सोशल मीडियावरून दिली माहिती
श्रेयाने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर ही बातमी दिली. तिने बेबी बंपसह फोटो शेअर करत लिहिले की, “बेबी श्रेयादित्या येत आहे. शिलादित्य आणि मी ही बातमी तुमच्यासोबत शेअर करून खूप आनंदित आहोत. आपल्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात करण्यासोबतच तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाचीही आवश्यकता आहे.”

खरं तर श्रेयाने सन २०१५ मध्ये शिलादित्यसोबत बंगाली रीतिरिवाजानुसार लग्न केले होते. हे त्यांचे पहिलेच अपत्य असणार आहे. तिला बॉलिवूडमधून शुभेच्छा मिळत आहेत.

श्रेया आपल्या आवाजासाठी ओळखली जाते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासारखाच तिचाही आवाज खूप गोड आहे. तिने आपल्या आवाजाने बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास मदत केली आहे. तिच्या गाण्यांमध्ये ‘चिकनी चमेली’, ‘दिवानी मस्तानी’, ‘घूमर’, ‘पिंगा’, ‘ओ जिजी’, ‘थोडी देर’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा


Leave A Reply

Your email address will not be published.