क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

nora fatehi was fiercely dancing with a little girl on her superhit song dilbar during the shooting of bharat watch video


‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या ‘दिलबर’ गाण्याने नोरा फतेहीने 2018 साली यूट्यूबर धमाल केली होती. या गाण्यानंतर नोरा इतकी प्रसिद्ध झाली की, आजही प्रेक्षकांवरील तिची जादू कायम आहे. या गाण्यानंतर जणू नोराचे भाग्यच चमकले!

यानंतर नोराने अनेक सुपरहिट गाण्यांवर धमाकेदार डान्स केले. तर काही चित्रपटांमध्ये ती केवळ शॉर्ट रोल करताना दिसली. असाच एक चित्रपट आहे ‘भारत’. ज्यात तिने सुनील ग्रोव्हरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची शूटिंग माल्टामध्ये झाली होती. जेव्हा माल्टामध्ये हा चित्रपट सेट झाला तेव्हा नोरा तिच्या चिमुकल्या चाहतीला भेटली. ती हुबेहूब नोरासारखे कपडे घालून तयार झाली होती. खास गोष्ट म्हणजे दोघींनी दिलबर गाण्यावर खूप सुंदर डान्सही केला होता.

या चिमुकल्या चाहतीने नोराला तिच्याबरोबर नाचण्याची विनंती केली. नोराने तिचे मन न दुखावता होकार दिला. नोराने चिमुकलीची विनंती पूर्ण केली आणि दिलबर गाण्यावर डान्स केला. खास गोष्ट अशी की चाहतीने नोराप्रमाणेच कपडे घातले होते. नोरा तिच्याकडे पाहतच राहिली. तुम्ही दोघींचा डान्स पाहिला, तर तुम्हीही त्या दोघींच्या प्रेमात पडाल.

वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेले हे ‘दिलबर’ गाणे नोराच्या कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण वळण ठरले. त्यानंतर, तिला कधीही मागे वळून पहावे लागले नाही. आज तिने इंडस्ट्रीमध्येही तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की परदेशातही याचा मोठा प्रभाव पडला. यानंतर गाण्याचे अरबी व्हर्जनही बनले.

नोरा फतेहीने तिच्या कारकिर्दीची सुरूवात ‘रोर- टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या हिंदी चित्रपटातून केली. त्यानंतर ती तेलुगु फिल्म ‘टेम्पर’मध्ये दिसली. यानंतर ती ‘किक 2’ आणि ‘बाहुबली’ या तेलगू चित्रपटांमध्येही दिसली आहे. याव्यतिरिक्त नोरा ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा भागही राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.