Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘कॉम्प्लॅन गर्ल’ आयशा टाकियाचा एका शस्त्रक्रियेने बदलून टाकलाय चेहरा, आज ओळखणंही जातंय कठीण

‘कॉम्प्लॅन गर्ल’ आयशा टाकियाचा एका शस्त्रक्रियेने बदलून टाकलाय चेहरा, आज ओळखणंही जातंय कठीण

‘कॉम्प्लॅन गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयशा टाकियाने, वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवले होते. तिचा जन्म मुंबईत झाला. मॉडलिंगनंतर ती बर्‍याच जाहिरातींमध्ये काम करताना दिसली. तिने शाहिद कपूर सोबत कॉम्प्लॅनसाठी जाहिरात केली होती. त्यानंतरच ती ‘कॉम्प्लॅन गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. शनिवारी (10 एप्रिल) आयशा तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बरेच संगीत व्हिडिओ झाले हिट
आयशाने 90 च्या दशकात अनेक संगीत व्हिडिओंमध्ये काम केले आहे. ती फाल्गुनी पाठक यांच्या ‘मेरी चुनर उड उड जाये’ गाण्यात दिसली होती. हे गाणे जबरदस्त हिट ठरले आणि चांगलेच गाजले. नंतर तिने ‘नहीं नहीं अभी नहीं’ म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले.

फिल्मी जगात ठेवले पाऊल:
मॉडेलिंग आणि संगीत अल्बममध्ये आयशाला नोटिस केले जाऊ लागले आणि तिला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. आयशाने ‘सोचा ना था’ आणि ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटांना साइन केले. ‘टार्झन’ प्रथम रिलीझ झाला होता. यातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार देखील मिळाला होता.

सन 2006 मध्ये रिलीझ झालेल्या ‘डोर’ या चित्रपटातील आयशाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हा छोट्या बजेटचा चित्रपट लोकांना खूप आवडला. यानंतर तिने ‘शादी नंबर 1’, ‘होम डिलिव्हरी’, ‘शादी से पहले’, ‘यु होता तो क्या होता’, ‘सलाम ए इश्क’, ‘क्या लव स्टोरी है’, ‘फुल अँड फायनल’, ‘संडे’, ‘पाठशाला’ आणि इतर अनेक चित्रपट केले. तथापि, आयशाच्या कारकिर्दीला या सिनेमांचा फारसा फायदा झाला नाही. पुढे 2009 मध्ये तिने सलमान खानसोबत ‘वॉंटेड’ हा चित्रपट केला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला.

https://www.instagram.com/p/B0ihu87nQPx/

फरहान आझमीशी केले लग्न
आयशा टाकियाने तिचा प्रियकर फरहान आझमीशी, मार्च 2009 मध्ये लग्न केले. त्यावेळी आयशा केवळ 23 वर्षांची होती. फरहान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. त्यांचे लग्न त्यावेळी बरेच चर्चेत होते. फरहानशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तरीही ती यावर कधीच उघडपणे बोलली नाही. आयशा आणि फरहानला मिकाईल आझमी नावाचा एक मुलगाही आहे. लग्नानंतर आयशा ग्लॅमर इंडस्ट्रीपासून बरीच दूर गेली. मात्र, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी तिचे फोटो पोस्ट करत राहते.

फोटो पाहून युजर्स झाले चकित
आयशा काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात दिसली होती, जिथे तिचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आयशाच्या गालांपासून ते ओठांपर्यंत सर्व काही खूप बदलले होते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, ती जबरदस्त ट्रोल होऊ लागली आणि तिची शस्त्रक्रिया बिघडल्याने हे झाले आहे, असे म्हटले जाऊ लागले. मात्र, आयशाने शस्त्रक्रियेची बाब नाकारली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेनेलियापासून ते ट्विंकलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम, आमिर खानच्या अभिनेत्रीचाही समावेश

-‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन!’ चित्रपटांपेक्षाही अधिक वादांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री स्वरा भास्कर, पाकिस्तानला म्हणाली होती, ‘अपयशी…’

-जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जयाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर मारली होती रेखाला कानाखाली, बघतच राहिले होते सर्वजण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा