जेव्हा चित्रपटाच्या सेटवर जयाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर मारली होती रेखाला कानाखाली, बघतच राहिले होते सर्वजण


बॉलिवूड क्षेत्रात एक काळ असाही होऊन गेला की, एका त्रिकूटाची चर्चा सर्वत्र झाली. ती म्हणजेच रेखा, महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची. या प्रेमाच्या त्रिकोणाला थांबा देत, अमिताभ यांनी जया यांचा हात धरला. तोही एक काळ होता, जेव्हा अमिताभ आणि रेखाच्या प्रेमाच्या चर्चा होत असत. तथापि, त्यांच्यावर अजूनही चर्चा आहे. शुक्रवारी (९ एप्रिल) जया बच्चन आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ९ एप्रिल, १९४८ रोजी जबलपूर येथे झाला होता. आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी संबंधित आणखी एक रंजक किस्सा सांगत आहोत, जेव्हा ते दोघे एकमेकांकडे प्रचंड आकर्षित झाले होते.

विवाहित अमिताभ बच्चनसाठी जिथे रेखा अनेकदा आपले प्रेम व्यक्त करताना दिसली आहे, बिग बी या प्रकरणात नेहमी शांत असतात. जया बच्चनसुद्धा या बातम्यांवर अतिशय सहजतेने प्रतिक्रिया देतात. अशा काही बातम्या मध्यंतरी येत राहिल्या, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. एक काळ असा होता की, गोष्टी त्यांच्या हाताबाहेर जात होत्या, तेव्हा जया स्वत: ला रोखू शकल्या नाहीत आणि ‘राम बलराम’ चित्रपटाच्या सेटवर रेखाला थोबाडीत मारली होती. निर्माता टिटो टोनीला अमिताभ बच्चन आणि रेखा या चित्रपटात कास्ट करायचे होते, पण जयाला ते नको होते. इंडस्ट्रीत चांगली पोहोच असल्याने जयाने टिटो टोनीला रेखाच्या जागी झीनत अमानला कास्ट करण्यासाठी पटवले.

रेखाला जेव्हा हे कळले, तेव्हा तिने चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद यांच्याकडे संपर्क साधला, आणि सांगितले की, तिला या चित्रपटात काम करायचे आहे. नंतर रेखाने टिटोला बोलावून अशी ऑफर दिली की, त्याला नकार देता  आला नाही. त्या म्हणाल्या की, मी चित्रपटात विनामूल्य काम करण्यास तयार आहे. मग काय, रेखा आणि अमिताभ समवेत या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात झाली. त्यावेळी जया अमिताभला रेखासोबत चित्रपट न करण्याबद्दल पटवून देऊन कंटाळली होती. पण ही जोडी हिट ठरली, आणि त्यांना बर्‍याच ऑफर एकत्र येत होत्या. ज्या बिग बीसुद्धा नाकारत नव्हते.

माध्यमातील वृत्तानुसार, त्याचवेळी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जया सेटवर पोहोचली. त्यावेळी रेखा आणि अमिताभ बच्चन एकांतात बोलत होते. हे जया बच्चन यांच्याकडून ते बघवले गेले नाही, आणि त्यांनी रागाने रेखाला अमिताभ बच्चन यांच्यासमोर थोबाडीत मारली. हे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक चकित झाले होते. मात्र, नंतर एका मुलाखतीदरम्यान जया बच्चन यांनी दोघांच्या नात्याबद्दल सांगितले होते की, जर ते खरे होते तर अमिताभ आज माझ्याबरोबर नसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आयुष्यातील २० वर्षे ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्र यांनी घालवली होती चाळीत, ५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली होती चित्रपटात संधी

-साठच्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी, तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे करिअर झाले होते बर्बाद

-सिनेप्रेमींसाठी खुशखबर! एप्रिल महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचा धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.