‘प्रेम रतन धन पायो‘, ‘रांझना‘ यांसारख्या चित्रपटातून ती प्रसिद्धीस आली आहे, तर हल्ली ती वेब सीरिजकडे सुद्धा वळली आहे. चित्रपटांपेक्षा वादांमुळे चर्चित राहिलेली अभिनेत्री म्हणूनही तिचे नाव घेतले जाते. ही अभिनेत्री म्हणजेच स्वरा भास्कर होय. स्वरा भास्करला बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. 9 एप्रिल रोजी स्वरा आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दिल्ली येथील रहिवासी असलेल्या स्वराने, आपल्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये ‘मढोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाली यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. 2011 मध्ये आलेल्या ‘तनू वेड्स मनू’या चित्रपटातून तीला आपली खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिने कंगना रनौतच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. मात्र, सोशल मीडियावर दोन्ही अभिनेत्री बर्याचदा एकमेकांना लक्ष्य करताना दिसतात. स्वरा ट्विटरवर खूपच सक्रिय असते आणि प्रत्येक विषयावर उघडपणे आपले मत नोंदवित असते. यामुळे तिलाही कधीकधी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. कधी तिच्या काही वक्तव्यांवरून तर कधी चित्रपटाच्या दृश्यांवरुन बरेच वादंग झाले आहेत. स्वरा भास्करशी संबंधित असे पाच विवाद आहेत ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया…
पाकिस्तानला ‘अपयशी राज्य’ असल्याचे सांगितले
‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान स्वरा भास्करने पाकिस्तानला ‘अपयशी राज्य’ असे म्हटले होते. तिच्या या विधानावरून तिला खूप ट्रोल केले गेले होते, आणि त्याचदरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. 2015मध्ये जेव्हा ती पाकिस्तानला गेली होती, तेव्हा एका टीव्ही शो दरम्यान तिने पाकिस्तानला सर्वोत्कृष्ट देश म्हणून वर्णन केले होते.
अॅमेझॉन विवाद
स्वरा भास्करने कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. तिने एक ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी हिंदुस्तानी आहे, मला लाज वाटते. कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, आणि तिची हत्या ‘देवीचे’स्थान असलेल्या ठिकाणी करण्यात आली.’ त्या काळात स्वरा ऍमेझॉनमधील ई-कॉमर्स वेबसाईटशी संबंधित होती. स्वराच्या ट्विटनंतर लोकांनी ‘#बॉयकोट ऍमेझॉन’ ट्रेंड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऍमेझॉनने स्वरा भास्करला सांगितले की, ‘तू दिलेला रिप्लाय हटव.’
‘पद्मावत’ वर खुले पत्र
स्वरा भास्करने, संजय लीला भंसाली यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाविषयी एक मुक्त पत्र लिहिले होते. तिने या चित्रपटावर टीका केली, आणि सांगितले की, यात जोहरच्या दृश्यांना भव्य पद्धतीने दाखवण्यात आले आहे. मग काय, तिला सोशल मीडियावर ट्रोल केरण्यात आले होते.
कंगना आणि स्वराचा ट्विटर वॉर
ट्विटरवर कंगना रनौत आणि स्वरा भास्कर बर्याचदा दिसतात. वारसापध्दती ते शेतकरी चळवळीपर्यंत या दोघांनी प्रत्येक विषयावर एकमेकांवर निशाना साधला आहे.
मास्टरबेशन सीन
करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांनी ‘वीरे दी वेडिंग’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या एका सीनमध्ये स्वरा भास्करने मास्टरबेशन सीन चित्रीत केले होते. यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली. तिचे हे दृश्य भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचे म्हटले जात होते.(story swara bhasker birthday special here her most controversial statement)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुलारी खेर यांनी केले पीएम मोदी यांच्या पदवीवर भाष्य, नेटकरी म्हणाले ‘केजरीवालांना उत्तर मिळाले’
साैंदर्याचा साज! केतकी माटेगावरकरच्या नव्या लूकने चाहते घायळ, फाेटाे व्हायरल










