आय्योवं.!! चालू व्हिडिओमध्येच अभिनेत्रीने बदलले कपडे; पाहा हिना खानचा आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड’ व्हिडिओ

TV Actress Hina Khan Share Her Bold And Sexy Video On Instagram Viral On Social Media


बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या सध्या आपल्या मालिका किंवा चित्रपटांमुळे नाही, तर चक्क आपल्या सोशल मीडियामुळे चर्चेत आहेत. या अभिनेत्रींपैकी एक आहे हिना खान. हिनाने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने यशाची एकेक पायरी चढत आपले एक स्थान निर्माण केले. काही वर्षांमध्येच हिनामध्ये जबरदस्त बदल झालेला आपल्याला दिसत आहे. हे तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंवरून सिद्ध होते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हटके फोटो आणि व्हिडिओंचा भडिमार आहे. अशातच आता ती तिच्या एका हॉट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच हिनाने आपला एक हॉट व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. कदाचित हा हिनाचा आतापर्यंतचा सर्वात हॉट व्हिडिओ आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

हिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिचे कपडे बदलताना दिसत आहेत. सुरुवातील पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट घातले आहे. त्यानंतर व्हिडिओ सुरू झाल्यानंतर लगेच तिचे कपडे बदलतात आणि ती स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये दिसू लागते. यादरम्यान हिना एका इंग्रजी गाण्यावर लिप्सिंग करताना बोल्ड मुव्ह करत आहे आहे. तिची ही अदा चाहत्यांनी भावली आहे. या व्हिडिओतील तिचा अंदाजही चाहत्यांना घायाळ करत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४.५० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हिना सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जवळपास दररोज ती आपला एक ना एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

खरं तर हिना ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अक्षराने आपली ओळख निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त हिनाने ‘फियर फॅक्टर खतरों के खिलाडी ८’ आणि ‘बिग बॉस ११’ या शोमध्येही दिसली आहे.

याव्यतिरिक्त हिना निर्माता एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की’ आणि ‘नागिन ५’ या हिट मालिकांमध्येही दिसली होती. नुकतेच हिना ‘बिग बॉस १४’मध्येही वरिष्ठ स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

हिना सध्या मालिकांव्यतिरिक्त चित्रपटांमध्येही आपला हात आजमावत आहे. सन २०२० मध्ये हिना ‘स्मार्ट फोन’, ‘हॅक्ड’ आणि झी फाईव्हवरील ‘अनलॉक’ या चित्रपटांमध्येही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.