Friday, March 29, 2024

Bigg Boss १४: रश्मी देसाईच्या विरोधात बोलल्याने हिना खानचे ‘या’ कंटेस्टेंटला प्रत्युत्तर; बोलतीच केली बंद

टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला ३ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी या शोमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलेच भांडण पाहायला मिळते. यावेळीही हे असेच पुढे सुरू आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये पहिल्या दिवसापासूनच वरिष्ठ स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान हे दिसत आहेत. त्यातच यासर्वांमध्येे जास्मीन भसीनने हिनाला नाराज केले आहे.

जास्मीनने ‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक रश्मी देसाईबद्दल असे काही म्हटले आहे, जे हिना खानला आवडले नाही.

‘बिग बॉस १४’ च्या प्रीमियरच्या दिवशीच जास्मीनने सांगितले होते की, तिला असे वाटते की रश्मी देसाई शोदरम्यान सिद्धार्थ शुक्लाला पोक करायची. त्यावेळीही हिना जास्मीनच्या या वक्तव्याशी सहमत नव्हती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जास्मीनने रश्मीबद्दल म्हटले आहे की, “मागील मोसमात रश्मी देसाई प्रत्येकाला पोक करायची.

आता जास्मीनच्या या वक्तव्यावर हिना खानने प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, “रश्मी देसाई एक हिरा आहे. ती एक चांगल्या मनाची मुलगी आहे. रश्मीलाही बिग बॉसच्या या घरात अनेकांनी पोक केले आहे. देवोलीनाला सोडले तर घरातील बाकी सर्व सदस्य रश्मीच्या विरोधात होते.”

हिनाचे बोलणं ऐकून जास्मीनची बोलती बंद झाली आणि तिला हिनाच्या वक्तव्याशी सहमत व्हावे लागले.

हे देखील वाचा