Saturday, June 29, 2024

वयाच्या १५ व्या वर्षीच ‘आर्ची’ बनली होती स्टार; बारावीचे पेपर द्यायला बॉडीगार्डलाही न्यावे लागायचे सोबत

‘आर्ची’ हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर सैराट आणि त्या सैराट मधल्या बिनधास्त, बेधडक रिंकूचा चेहरा आपोआपच येतो. सैराट सिनेमाला आज प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली. मात्र, आर्चीची लोकप्रियता आणि तिची ही ओळख काय कमी झाली नाही. किंबहुना रिंकू अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सैराट प्रदर्शित झाला आणि लोकांनी रिंकूला डोक्यावर घेतले. रिंकू आजही लोकांमध्ये ‘आर्ची’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. अतिशय कमी वयात तिला प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. आज म्हणजेच ३ जून सर्वांच्या लाडक्या रिंकूचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया रिंकू बद्दलच्या अनेक गोष्टी…

प्रेरणा महादेव राजगुरु हे रिंकूचे खरे नाव. मात्र, ती शाळेत, घरात आणि आता संपूर्ण जगभरात रिंकू नावानेच ओळखली जाते. ३ जून, २००१ साली रिंकूचा अकलूजमध्ये जन्म झाला. रिंकूचे वडील महादेव राजगुरु हे अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात प्राथमिक शिक्षक आहेत, तर तिची आई आशा राजगुरु यादेखील माळीनगर येथील संग्रामनगर प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत.

रिंकूला नृत्याची विशेष आवड आहे. यासाठी तिने कोणताही क्लास न लावता केवळ घरीच सर्व करत आपली आवड जोपासली आहे. सैराटसाठी नागराज मंजुळेंनी तिचे ऑडिशन घेताना तिला आधी नृत्य करायला लावले होते. रिंकू अडीच वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी तिला त्यांच्या शाळेतील स्नेहसंमेलनाला नेले होते. स्टेजवर मुली लावणी सादर करत होत्या, तेव्हा रिंकू त्या स्टेजजवळ जाऊन बिनधास्त लावणीवर नाचली होती.

रिंकूला चित्रकलेचीही खूप आवड आहे. तिने चित्रकलेची एलिमेंट्री परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिच्या बेडरुममध्ये तिने काढलेली छायाचित्रे भिंतीवर लावण्यात आली आहेत. शिवाय रिंकूला क्रिकेट खेळायलाही प्रचंड आवडते.

रिंकूला तिच्या पहिल्याच सिनेमात तुफान लोकप्रियता मिळाली. इतकी की आजही रिंकू अनेक ठिकाणी ‘आर्ची’ म्हणूनच ओळखली जाते. या मनोरंजन क्षेत्रात पहिल्याच सिनेमात अशी तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्री खूपच कमी आहेत. मराठीत तर अशा अभिनेत्री बोटांवर मोजण्या इतक्याच असतील, अशा निवडक अभिनेत्रींमध्ये रिंकूची गणना केली जाते. अकलूज जिल्ह्यात राहणाऱ्या रिंकूला आपण आयुष्यात कधी एवढे मोठे आणि प्रसिद्ध होऊ असे कधीच वाटले नसेल, तिच्यासाठी देखील हे यश स्वप्नवतच असेल.

रिंकूचा किंवा तिच्या कुटुंबाचा दूरदूरपर्यंत चित्रपटांशी संबंध नव्हता. एकदा चित्रपटाच्या कामासाठी नागराज मंजुळे रिंकूच्या गावात गेले होते. नागराज आल्याची बातमी गावात पसरली आणि त्यांना बघणाऱ्यांची गर्दी झाली. त्याच गर्दीत रिंकू देखील होती. नागराज यांना तिला बघताच ती ‘आर्ची’साठी अतिशय योग्य असल्याचे जाणले आणि त्यांनी लगेचच तिचे ऑडिशन घेऊन तिला भूमिकेसाठी फायनल केले. त्यांना ‘आर्ची’साठी जशी मुलगी हवी होती तशीच रिंकू असल्याने तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रिंकूमधील अभिनय क्षमता ओळखली आणि तिला मोठ्या पडद्यावर लाँच केले. रिंकूनेसुद्धा अपार मेहनतीने आणि ध्यासाने तिला मिळालेल्या संधीचे सोने केले. शिवाय वयाच्या केवळ १५ व्या राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.

या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर रिंकूची लोकप्रियता तुफान होती. तिच्या लोकप्रियतेचा एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. सिनेमा साईन करताना रिंकू ७ वीला होती. मात्र, जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा १० वीला होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रिंकूबद्दल लोकांचे प्रेम इतके वाढले होते की, तिने १० वीला शाळा सोडली आणि बाहेरून १० वीची परीक्षा दिली. पुढे १२ वीला परीक्षा देताना रिंकूला परीक्षा सेंटरवर तिच्या बॉडीगार्ड्सला सुद्धा न्यावे लागायचे. तिला बघायला लोकांची अमाप गर्दी असायची.

आज सैराटला प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाले. या वर्षात रिंकूने स्वतःमध्ये प्रचंड बदल करून घेतला आहे. आता ती अतिशय ग्लॅमरस झाली आहे. सोबतच रिंकूने तिच्या लूकवरही मोठे काम केले आहे. पूर्वीपेक्षा तिच्यात अनेक बदल झाले आहेत. तसेच ती स्वतःला अधिकाधिक फिट करण्याचा प्रयत्न करत आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. फॅन्सला देखील तिचा हा नवा अवतार चांगलाच पसंतीस पडत आहे.

रिंकूने सैराटनंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने सैराटनंतर भराभर सिनेमे न करता मोजकेच आणि हटके सिनेमे केले. तिने स्वतःला कधीच एक चौकटीत बांधून घेतले नाही. सोबतच ती मराठी पुरती मर्यादित न राहता तिने हिंदीमध्ये देखील काम केले आहे. तिने हिंदीमध्ये काही वेबसीरिजमध्ये काम केले असून, सैराटचा कन्नड रिमेक असलेल्या ‘मनसू मलिंगे’ सिनेमात देखील काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ चिमुकल्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने केला ऑनस्क्रिन राेमान्स, ओळखा पाहू काेण?
पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा