Thursday, June 13, 2024

पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके‘ हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी आणि सारा अनेक शहरांमध्ये गेले, जिथे त्यांनी अनेक कार्यक्रम आणि मुलाखतींना हजेरी लावली.

अशात या चित्रपटाचे स्टार्स काल गुरुवारी (दि. १ जुन)ला दिल्लीत होते आणि त्याआधी त्यांनी इंदाेर आणि अमृतसरलाही भेट दिली होती. आता विक्की (vicky kaushal) याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे की, तो अखेर मुंबईतील त्याच्या घरी पोहोचला आहे. दरम्यान अभिनेत्याच्या प्रमोशनल टूरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

चित्रपटाच्या प्रमाेशनदरम्यान, सारा आणि विकी दिल्ली येथील जनपथ मार्केटमध्ये गेले, जिथे त्यांनी कानातले आणि इतर दागिन्यांची खरेदी केली. शॉपिंग व्यतिरिक्त विकी एका प्रेस इव्हेंटमध्ये ओब्सेस्ड या पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी विकीसोबत साराही मंचावर उपस्थित होती. सारा आणि प्रेक्षकांनी विकीचा डान्स खूप एन्जाॅय केला. ऑब्सेस्ड गाण्यावर डान्स करतानाचा विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, चाहते अभिनेत्याच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABP UNCUT (@abpuncut)

अलीकडेच एका मुलाखतीत विकीला विचारण्यात आले होते की, “त्याचा सेलिब्रिटी क्रश कोण आहे?” उत्तरात विकी म्हणाला, “माझी पत्नी.” यावर तिथे बसलेले सर्व लोक चीअर करू लागले आणि साराही हसायला लागली. अशात जेव्हा सारालाही हाच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने विकीच्या दिशेने बोट दाखवत सांगितले की, “हा प्रश्न माझ्यासाठी खूप सोपा आहे. माझा सेलिब्रिटी क्रश विकीची पत्नी आहे.”

‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशात या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. (bollywood actor vicky kaushal dance on punjabi song obsessed during zara hatke zara bach ke video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती

महाभारत फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा