Thursday, June 13, 2024

‘या’ चिमुकल्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने केला ऑनस्क्रिन राेमान्स, ओळखा पाहू काेण?

प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडीच्या कलाकाराविषयी सर्व माहिती ठेवणे फार आवडते. कलाकारांच्या आयुष्यातील अगदी बालपणापासूनची माहिती काही चाहते ठेवत असतात. कलाकारांचे बालपण, त्यांच्या आयुष्यातील जोडीदार, त्यांचे राहणीमान या सर्व गोष्टींची माहिती ठेवत, अनेकजण काही कलाकारांचा आदर्श घेत देखील पुढे जात असतात. अशात सोशल मीडियावर सध्या एक फाेटाे चांगलाच व्हायरल हाेत आहे. इतकच नव्हे, तर व्हायरल झालेल्या फाेटाेंमध्ये ऋतिकसाेबत एक चिमुकला देखील दिसत आहे. काेण आहे हा चिमुकला? ज्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने ऑन स्क्रिन राेमान्स केला. चला, तर जाणून घेऊया…

मंडळी, ऋतिक रोशनसोबतच्या फोटोमध्ये दिसणार्‍या दोन मुलांपैकी एक दुसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आहे. तर, दुसरा चिमुकला त्याचा धाकटा भाऊ अभिनेता सनी कौशल आहे. फोटोमध्ये ऋतिक रोशन मध्यभागी उभा असल्याचे दिसत असून त्याने विकी आणि सनीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आहे, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

ऋतिकने विकीची पत्नी अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत ‘बँग बँग’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय कॅटरिनाने ऋतिकच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातही आयटम साॅंग केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी काैशलच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्याचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. याचित्रपटात विकीसाेबत सारा अली खानही मुख्य भूमिकेत आहे.( did you recognize this child who seen with bollywood actor hrithik roshan in this photo hrithik has romanced his wife on screen photo viral on social media )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला आहे बाजारात फिरण्याचा नाद; व्हिडिओ व्हायरल

‘टायगर 3’च्या सेटवरून व्हिडिओ लीक! शाहरुख अन् सलमानचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक

हे देखील वाचा